Nitish Kumar Reddy: मानलं रे पठ्ठ्या! पहिल्याच सामन्यात नितीश रेड्डीने मोडला रोहित अन् रैनाचा मोठा रेकॉर्ड
Nitish Kumar Breaks Suresh Raina And Rohit Sharma Record:
आयपीएल २०२३ स्पर्धेतील २३ व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने २ धावांनी विजय मिळवला आहे. हैदराबादला हा सामना जिंकून देण्यात नितीश कुमार रेड्डीने मोलाची भूमिका बजावली.
या सामन्यात फलंदाजी करताना त्याने ३७ चेंडूंत ६४ धावांची खेळी केली. त्यानंतर गोलंदाजी करताना त्याने १ गडी देखील बाद केला. यादरम्यान त्याने सुरेश रैना आणि रोहित शर्माचा एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
रोहित अन् रैनाचा रेकॉर्ड मोडला..
या सामन्यात ज्यावेळी सनरायझर्स हैदराबादचा संघ फलंदाजीत संघर्ष करत होता. त्यावेळी त्याने फलंदाजीला येत अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर गोलंदाजी करताना त्याने १ गडी देखील बाद केला. वयाच्या २० व्या वर्षी त्याने आयपीएल स्पर्धेत खेळताना एकाच षटकात अर्धशतकी खेळी आणि गोलंदाजीत १ गडी बाद केला आहे.
हा कारनामा त्याने २० वर्ष ३१९ दिवस वय असताना केला आहे. तर रोहित शर्माने हा कारनामा २१ वर्ष २३ दिवस इतकं वय असताना केला होता. तर सुरेश रैनाने हा कारनामा २२ वर्ष १४५ दिवस इतकं वय असताना केला होता. या यादीत सनरायझर्स हैदराबाद संघातील आणखी एका खेळाडूचा समावेश आहे. अभिषेक शर्माने २२ वर्ष २३७ दिवस इतकं वय असताना हा कारनामा केला होता. (Cricket news in marathi)
आयपीएल स्पर्धेत सर्वात कमी वयात ५० पेक्षा अधिक धावा करणारे आणि १ गडी बाद करणारे खेळाडू..
२० वर्ष ३१९ दिवस - नितीश कुमार
२१ वर्ष २३ दिवस - रोहित शर्मा
२२ वर्ष १५४ दिवस- सुरेश रैना
२२ वर्ष २३७ दिवस - अभिषेक शर्मा
२२ वर्ष २८३ दिवस- अँजेलो मॅथ्यूज
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.