NZ vs AFG: चेन्नईत घोंघावलं किवी वादळ!! चौथा उलटफेर करण्यासाठी २८९ धावांची गरज

New Zealand vs Afghanistan: या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे.
New Zealand vs Afganistan
New Zealand vs Afganistantwitter
Published On: 

New Zealand vs Afghanistan:

वर्ल्डकप स्पर्धेतील १६ वा सामना न्यूझीलंड आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने सुरूवातीच्या आणि शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करत २८८धावांचा डोंगर उभारला आहे. अफगाणिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी २८९ धावांची गरज आहे.

तिसरा मोठा उलटफेर पाहायला मिळणार का?

अफगाणिस्तानचा संघ सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. गेल्या सामन्यात अफगाणिस्तानने बलाढ्य इंग्लंड संघाचा धुव्वा उडवला होता. त्यानंतर नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत दुसरा मोठा उलटफेर केला होता. आता न्यूझीलंड हरवून अफगाणिस्तानकडे तिसरा मोठा उलटफेर करण्याची संधी आहे. हा उलटफेर करण्यासाठी अफगाणिस्तानला २८९ धावांची गरज आहे. (Latest sports updates)

New Zealand vs Afganistan
IND vs BAN, Playing XI: बांगलादेशला धुळ चारण्यासाठी रोहितचा 'मास्टरप्लान; संघात स्टार खेळाडूला देणार स्थान;पाहा प्लेइंग ११

लेथम अन् फिलिप्सची पार्टनरशिप..

या सामन्याच्या सुरूवातीलाच न्यूझीलंडला मोठा धक्का बसला होता. सलामीवीर फलंदाज डेवोन कॉनवे २० धावा करत माघारी परतला. त्यानंतर विल यंग आणि रचिन रविंद्रने पार्टनरशिप करत संघाची धावसंख्या १०० च्या पुढे पोहचवली. विल यंगने या डावात ५४ धावांची खेळी केली.

तर टॉम लेथमने ७४ चेंडूंचा सामना करत ६८ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले.

New Zealand vs Afganistan
IND vs BAN, Playing XI: बांगलादेशला धुळ चारण्यासाठी रोहितचा 'मास्टरप्लान; संघात स्टार खेळाडूला देणार स्थान;पाहा प्लेइंग ११

तर ग्लेन फिलिप्सने ८० चेंडूंचा सामना करत ७१ धावा चोपल्या. संघाची धावसंख्या ४ गडी बाद १०४ धावा असताना या दोघांनी १५० धावांची पार्टनरशिप करत संघाची धावसंख्या २५० च्या पुढे पोहचवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com