T-20 WC 2024: मोठी बातमी! टी-२० वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा; या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

New Zealand Squad For T20 World Cup 2024: आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. पाहा संपूर्ण संघ
New zealand cricket board announced their squad for t20 world cup 2024 kane williamson named as captain amd2000
New zealand cricket board announced their squad for t20 world cup 2024 kane williamson named as captain amd2000twitter

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. येत्या १ जूनपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील सामने वेस्टइंडीज आणि अमेरिकेत रंगणार आहे. या स्पर्धेसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने आपल्या संघाची घोषणा केली आहे. या संघाची धुरा संघातील अनुभवी खेळाडू केन विलियम्सनकडे सोपवण्यात आली आहे.

यासह न्यूझीलंडचा संघ टी-२० वर्ल्डकपच्या रणसंग्रामासाठी सज्ज असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी अंतिम संघाची घोषणा करणारा न्यूझीलंड हा पहिलाच संघ ठरला आहे.

न्यूझीलंडने आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठीही हटके पद्धतीने संघाची घोषणा केली होती. त्यावेळी ज्या खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं आहे. अशा खेळाडूंच्या पत्नी आणि मुलांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. आता दोन चिमुकल्यांनी पत्रकार परिषदेत येत संघाची घोषणा केल्याचे पाहायला मिळाले आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार हा अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्यासह नव्या जर्सीचे अनावरणही करण्यात आले आहे.

New zealand cricket board announced their squad for t20 world cup 2024 kane williamson named as captain amd2000
CSK vs SRH,IPL 2024: हैदराबादकडून पराभवाचा बदला घेण्यासाठी CSK उतरणार मैदानात; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा आहे न्यूझीलंडचा संघ..

केन विलियम्सन (कर्णधार), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर , ईश सोधी , टिम साउदी, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल.

New zealand cricket board announced their squad for t20 world cup 2024 kane williamson named as captain amd2000
GT vs RCB, IPL 2024: RCB साठी 'करो या मरो'ची लढत! विजयासाठी गुजरातने ठेवलं २०१ धावांचं आव्हान

केन विलियम्सनकडे संघाची धुरा..

केन विलियम्सन हा न्यूझीलंड संघाचा सर्वात अनुभवी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना न्यूझीलंड संघाने २०१६ मध्ये सेमीफायनल, २०२१ मध्ये झालेल्या स्पर्धेत फायनल, आणि २०२२ मध्ये झालेल्या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये धडक दिली होती. यंदा हा संघ जेतेपदावर नाव कोरण्याच्या प्रयत्तात असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com