Kane Williamson: 'सारा'झाली आई! क्रिकेटपटूने पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी -Photo

Kane Willamson Baby Girl: न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियम्सन तिसऱ्यांदा बाबा बनला आहे. त्याला कन्यारत्नप्राप्ती झाली आहे
new zealand star cricketer kane williamson and wife sarah raheem blessed with a baby girl
new zealand star cricketer kane williamson and wife sarah raheem blessed with a baby girl instagram/kane williamson

Kane Williamson Wife Sarah Raheem:

न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियम्सन तिसऱ्यांदा बाबा बनला आहे. त्याला कन्यारत्नप्राप्ती झाली आहे. केन विलियम्सनने सोशल मीडियावर आपल्या कुटुंबाचा फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. त्याला दोन मुलं आहेत. पहिली मुलगी ३ वर्षांची तर दुसरा मुलगा १ वर्षाचा आहे. आता त्यांच्या कुटुंबात मुलीचं आगमन झालं आहे. त्याच्या या पोस्टवर क्रिकेट चाहते कमेंट करुन कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

केन विलियम्सनने (Kane Williamson) ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये केन विलियम्सन आपली पत्नी सारा (Sarah Raheem) आणि आपल्या मुलीसह असल्याचं दिसून येत आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने,'या सुंदर जगात तुझे स्वागत आहे...'असे लिहिले आहे. केन विलियम्सनच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तसेच संघातील सहकाऱ्यांनी देखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. (Cricket news marathi)

new zealand star cricketer kane williamson and wife sarah raheem blessed with a baby girl
IND vs ENG: धरमशाला कसोटीत जॉनी बेअरस्टोला इतिहास रचण्याची संधी! दिग्गज खेळाडूंच्या यादीत करणार प्रवेश

केन विलियम्सनची पहिली मुलगी ३ वर्षांची असून तिचं नाव मॅगी असं आहे. तर दुसरा मुलगा १ वर्षाचा आहे. सध्या विलियम्सन कुटुंब नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यात व्यस्त आहे. केन विलियम्सनने देखील क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. तो आपला पूर्णवेळ आपली पत्नी साराला देत आहे.

या कारणामुळे तो न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेत खेळताना दिसून आला नव्हता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका खेळल्यानंतर त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. २९ फेब्रुवारीपासून तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत कमबॅक करताना दिसून येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. त्याची पत्नी अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला आहे. या मुलाचं नाव त्यांनी अकाय असं ठेवलं आहे.

new zealand star cricketer kane williamson and wife sarah raheem blessed with a baby girl
IND vs ENG 5th Test: धरमशालेत रंगणार भारत- इंग्लंड अंतिम कसोटी सामना! इथे कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com