Neeraj Chopra News: गोल्डन बॉय नीरजचा दरारा कायम! एकच थ्रो अन् थेट वर्ल्ड अॅथलेटीक्स चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्री

World Athletics Championship: भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरज चोप्राने स्वीडनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड अॅथलेटीक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे
Neeraj Chopra
Neeraj ChopraSaam Tv
Published On: 

Neeraj Chopra In World Athletics Championship:

भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरज चोप्राने स्वीडनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड अॅथलेटीक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. यासह त्याने पुन्हा एकदा भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याच्या आशा जागवल्या आहेत.

त्याने वर्ल्ड अॅथलेटीक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील भालाफेक या इव्हेंटमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

त्याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटर भाला फेकून अंतिम फेरी गाठली आहे. स्पर्धेतील अंतिम सामना २७ ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे.

Neeraj Chopra
Asia Cup 2023: टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी! संघात निवड होऊनही 'या' खेळाडूला काही सामने राहावं लागेल संघाबाहेर

पॅरीस ऑलिम्पिकसाठी ठरलाय पात्र..

या हंगामातील ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी त्याची वर्तमानातील सर्वोत्तम कामगिरी ८८.६७ मीटर इतकी होती. या दमदार कामगिरीसह तो पॅरीस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेसाठी देखील पात्र ठरला आहे.

ही स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेत नीरजच चोप्रासह ३६ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

नीरजला ग्रुप ए मध्ये ठेवण्यात आले होते. ज्यात वर्ल्ड चॅम्पियन अँडरसन पीटर्स आणि जुलियन पीटर्स यांचा समावेश आहे.

तर ग्रुप बी मध्ये पाकिस्तानचा अरशद खान आणि जॅकब वाडलेच सारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी नीरजला ८३ मीटर लांब भाला फेकायचा होता. त्याने ८७. ७७ मीटर लांब भाला फेकून आपलं स्थान निश्चित केलं आहे. (Latest sports updates)

नीरजने २०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिक त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. इतकेच नव्हे तर तो अॅथलेटीक्समध्ये सुवर्णपदक पटकावणारा पहिलाच भारतीय अॅथलीट ठरला होता.

त्यावेळी नीरजने ८७.५८ मीटर लांब भाला फेकला होता. त्यानंतर त्याने डायमंड लीग स्पर्धेत देखील सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.