आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात केएल राहुलचा बॅकअप म्हणून संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आले आहे. दुखपतीपतीतून कमबॅक करत असलेला केएल राहुल फलंदाजीत चांगली कामगिरी करतोय.
मात्र यष्टिरक्षण करण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे केएल राहुल आशिया चषकातील सुरुवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो.
काही सामने राहावं लागेल बाहेर..
मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी स्पष्ट केले होते की, केएल राहुल उजव्या मांडीच्या दुखापतीतून सावरला आहे. मात्र अजूनही काही अडचणी आहेत. ज्यामुळे त्याला आशिया चषकातील सुरुवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर राहावं लागू शकतं.
तसेच श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट असून NCA ने त्याला हिरवं कंदील दाखवलं आहे. मात्र त्याच्यावर देखील बारकाईने लक्ष ठेवलं जाणार आहे. कारण तो देखील दुखापतीतून कमबॅक करतोय. २९ ऑगस्टपर्यंत भारतीय संघाचं सराव शिबिर असणार आहे. त्यानंतर भारतीय संघ कोलंबोला रवाना होणार आहे.
भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी..
केएल राहुलने NCA मध्ये दमदार कामगिरी करत कमबॅक करणार असल्याची खात्री पटवून दिली आहे. मात्र तो यष्टिरक्षण करणार का? याबाबत अजून कुठलीही माहिती समोर आली नाही. भारतीय संघ ३० ऑगस्टला कोलंबोला रवाना होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
भारतीय संघाला २ सप्टेंबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध दोन हात करायचे आहेत. तर १७ सप्टेंबर रोजी स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे. (Latest sports updates)
आशिया चषकासाठी असा आहे भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर. , सूर्यकुमार यादव , तिलक वर्मा , प्रसिद्ध कृष्णा , संजू सॅमसन (राखीव).
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.