

IND vs WI 1st Test : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने मोठा पराक्रम केला आहे. अश्विनने वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा सलामीवीर तेजनारायण चंद्रपॉलची विकेट घेतली आणि कसोटी क्रिकेटमध्ये पिता-पुत्राची विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला.
अश्विनने तेजनारायणचे वडील आणि वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू शिवनारायण चंद्रपॉल यालाही बाद केले होते. अश्विनने 2011 मध्ये दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
पहिल्या कसोटीत त्याने वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात शिवनारायण चंद्रपॉलला एलबीडब्ल्यू केले होते. त्या डावात चंद्रपॉल 47 धावा करून बाद झाला होता. अश्विनने त्या कसोटीत एकूण 9 विकेट्स घेतल्या होत्या. (Latest sports updates)
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या सत्रात अश्विन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. लंचची घोषणा होईपर्यंत त्याने 10 षटकांत 25 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. तेजनारिनशिवाय अश्विनने विंडिज कर्णधार क्रेग ब्रॅथवेटचीही विकेट घेतली आहे. लचंपर्यंत वेस्ट इंडिजने 4 गडी गमावून 68 धावा केल्या आहेत. अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत आतापर्यंत 60 हून अधिक विकेट घेतल्या आहेत. तर अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 470 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक 164 कसोटी सामने खेळणाऱ्या शिवनारायणने 51.37 च्या सरासरीने 11,867 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत 30 शतके आणि 66 अर्धशतके ठोकली आहेत. ब्रायन लाराच्या कसोटीत 11,912 धावा आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक कसोटी धावा करणारा चंद्रपॉल दुसरा खेळाडू आहे. याशिवाय त्याने 268 एकदिवसीय सामन्यांमध्ये 41.60 च्या सरासरीने 8,778 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 11 शतके आणि 59 अर्धशतके केली आहेत.
तेजनारायणने 2022 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. त्याने आतापर्यंत 12 डावात 465 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 42.27 इतकी आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. त्याने 1 द्विशतकही झळकावले असून नाबाद 207 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.