ICC Test Rankings: कसोटी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर, नंबर १ च्या दावेदाराला टाकलं मागे; या खतरनाक फलंदाजानं मारली बाजी

ICC Rankings: आयसीसीने कसोटी फलंदाजांची यादी जाहीर केली आहे
england cricket team
england cricket teamsaam tv
Published On: 

Men's Test Player Rankings: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील ३ सामने झाले असून चौथ्या सामन्याला लवकरच प्रारंभ होणार आहे. तर भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघामध्ये देखील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे.

या मालिकेपूर्वी आयसीसीने कसोटी फलंदाजांची यादी जाहीर केली आहे. ज्यात भारतीय खेळाडूंच्या हाती निराशा लागली आहे. तर बाबर आझमला मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. (ICC Test Ranking)

england cricket team
Team India Playing 11: पहिल्या कसोटी सामन्यासाठी कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11? स्वतः रोहितने केला खुलासा

केन विलियमसन नंबर १..

आयसीसीकडून कसोटी फलंदाजांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विलियमसन अव्वल स्थानी असल्याचे दिसून आहे. गेल्या वेळी देखील जेव्हा ही यादी जाहीर करण्यात आली होती त्यावेळी देखील केन विलियमसन अव्वल स्थानी कायम होता.

त्याने ८८३ रेटिंग पॉईंट्ससह आपलं अव्वल स्थान टिकवून ठेवलं आहे. तर अॅशेस मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या ट्रेविस हेडला देखील या यादीत मोठा फायदा झाला आहे. या यादीत तो आता दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याचे रेटिंग पॉईंट्स ८७४ इतके आहेत. तर यापूर्वी दुसऱ्या स्थानी असलेला स्टीव्ह स्मिथ आता चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. (Latest sports updates)

england cricket team
Team India New Jersey: जत्रेतून आणलीये का?, टीम इंडियाची नवी जर्सी पाहून फॅन्स संतापले

स्टीव्ह स्मिथची घसरगुंडी. ..

अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियासाठी जोरदार कामगिरी करणारा स्टीव्ह स्मिथ नंबर १ बनण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात होतं. मात्र नुकताच प्रसिद्ध झालेल्या कसोटी फलंदाजांच्या यादीत त्याची मोठी घसरगुंडी झाली आहे. तो ८५५ रेटिंग पॉईंट्ससह चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर मार्नस लाबुशेन ८४९ रेटिंग पॉईंट्ससह पाचव्या स्थानी पोहोचला आहे. टॉप १० फलंदाजांच्या यादीत एकमेव भारतीय फलंदाज आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला रिषभ पंत ७५८ रेटिंग पॉईंट्ससह १० व्या स्थानी कायम आहे.

टॉप १० फलंदाजांची यादी..

१. केन विलियमसन : ८८३

२. ट्रेविस हेड : ८७४

३. बाबर आझम : ८६२

४. स्टीव्ह स्मिथ : ८५५

५. मार्नस लाबुशेन : ८४९

६. जो रूट : ८४२

७. उस्मान ख्वाजा :८२४

८. डेरिल मिशेल :७९२

९. दिमुथ करुणारत्ने : ७८०

१०. रिषभ पंत: ७५८

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com