DC vs MI : मुंबई इंडियन्सने सलग दुसऱ्यांदा कोरलं WPL चषकावर नाव; अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला चारली धूळ

DC vs MI match highlights : मुंबई इंडियन्सने सलग दुसऱ्यांदा WPL चषकावर नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला धूळ चारली आहे.
mumbai indians team
mumbai indians Saam tv
Published On

मुंबई इंडियन्सने वुमेन्स प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला ८ धावांनी धूळ चारली आहे. मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने ६६ धावा आणि गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवला.

दिल्ली कॅपिटल्सला सलग तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागलं आहे. दिल्ली कॅपिटल्सला सलग तिसऱ्यांदा स्पर्धेचा उप विजेता व्हावं लागलं आहे. प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रण मिळाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ फलंदाजी करण्यास उतरला. फलंदाजी करण्यास उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने २० षटकात सात गडी गमावून १४९ धावा कुटल्या.

mumbai indians team
IPL 2025, Mumbai Indians Schedule: MI vs CSK एकदा नाही, तर दोनदा भिडणार? पाहा मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रक

मुंबई इंडियन्ससाठी हरमनप्रीतने अर्धशतक ठोकलं. हरनप्रीतने ४४ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकार ठोकले. मात्र, हरनप्रीतला कोणी योग्य साथ दिली नाही. यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार हरनप्रीतने नॅट सायवर ब्रंटसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६२ चेंडूत ८९ धावांची भागिदारी रचली. दोघांच्या ६२ धावांच्या भागिदारीमुळे मुंबई इंडियन्सने इतकी धावसंख्या उभारली.

mumbai indians team
IPL 2025: ...तर रोहित-सूर्यकुमार MI सोडून जाऊच शकत नाहीत; आयपीएलपूर्वी BCCI घेणार मोठा निर्णय?

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी दिलेल्या आव्हानाचा चांगला बचाव करत दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात विजय मिळवून दिला. संघाने २०२३ सालानंतर दुसऱ्यांदा विजेता होण्याचा सन्मान मिळवला आहे. नॅट सायवर ब्रंटने ३० धावा देऊन ३ गडी बाद केले. अमेलिया केरने २५ धावा देऊन २ गडी बाद केले. तर शबनीम इस्माइन , हेली मॅथ्यूज आणि सायका इशाकने प्रत्येकी एक-एक विकेट घेतले.

mumbai indians team
Mi Honar Superstar: यवतमाळच्या चिमुकलीची मोठी झेप,गीत बागडेने 'छोटे उस्ताद ३' च्या ट्रॉफीवर कोरलं नाव,पैशांचा पाऊस!

दिल्ली कॅपिटल्ससाठी मारिजाने कापने २६ चेंडूत ४० धावा केल्या. जेमिमा रोड्रिग्सने २१ चेंडूत ३० धावा केल्या. निकी प्रसादने २३ चेंडूत २५ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजी आव्हानाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटकात ९ गडी गमावून फक्त १४१ धावा केल्या.

दिल्ली कॅपिटल्ससाठी मारिजाने कापने ४ षटकात ११ धावा दिल्या. तिने मुंबई इंडियन्सचे सलामीवर हेली मॅथ्यूज आणि यास्तिका भाटियाला तंबूत पाठवलं. त्यानंतर फिरकीपटू श्री चरानीने ४३ धावा देऊन २ गडी बाद केले. तर जोनासनेने २६ धावा देऊन दोन गडी बाद केले. सदरलँडने हरमनप्रीतला बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com