Babar Azam Clean Bowled: याला काय अर्थ आहे राव! लहान मुलाने बाबर आझमला केलं क्लीन बोल्ड

Babar Azam Viral Video: बाबर आझमला सराव सामन्यात लहान मुलाने क्लीन बोल्ड केल्याचा व्हिडिओस सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Babar Azam Clean Bowled: याला काय अर्थ आहे राव! लहान मुलाने बाबर आझमला केलं क्लीन बोल्ड
babar azam twitter
Published On

क्रिकेटमध्ये फलंदाजाचा फॉर्म हा येत जात राहतो. फलंदाज जेव्हा फॉर्ममध्ये असतो त्यावेळी तो जगातील कुठल्याही गोलंदाजाची धुलाई करू शकतो. मात्र तो जर आऊट ऑफ फॉर्म असेल तर लहान मुलंही त्याची दांडी उडवू शकतात.

असच काहीसं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसोबत झाल्याचं पाहायला मिळालं आहे. बाबर आझमला लहान मुलाने क्लीन बोल्ड केलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

एक्स अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात बाबर आझम एका लोकल क्रिकेट स्पर्धेत फलंदाजी करताना दिसतोय. मात्र फलंदाजी करताना डावखुऱ्या हाताचा गोलंदाज मोहम्मद असगरने त्याला क्लीन बोल्ड केलं. या युवा गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवर बाबर आझमने स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटला स्पर्श न होता, मधल्या यष्टीला जाऊन धडकला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Babar Azam Clean Bowled: याला काय अर्थ आहे राव! लहान मुलाने बाबर आझमला केलं क्लीन बोल्ड
Viral Cricket Video: लेडी बुमराह...शाळेचा गणवेश घालून तरुणीची भन्नाट गोलंदाजी; VIDEO पाहून कौतुकच कराल

पाकिस्तानमध्ये येत्या १२ सप्टेंबरपासून चॅम्पियन्स वनडे कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बाबर आझम आपल्या संघासोबत कसून सराव करतोय ही स्पर्धा १२ सप्टेंबरला सुरू होणार असून २९ सप्टेंबर रोजी या स्पर्धेतील फायनलचा सामना खेळला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला मायदेशात खेळताना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. बांगलादेशने पाकिस्तानला २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने धूळ चारली आहे.

Babar Azam Clean Bowled: याला काय अर्थ आहे राव! लहान मुलाने बाबर आझमला केलं क्लीन बोल्ड
Viral Cricket Video: पाकिस्तानातही बुमराहची क्रेझ! चिमुकल्याचे बॉलिंग ऍक्शन पाहून वसीम अक्रमही खूश, पाहा VIDEO

बांगलादेशविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंवर जोरदार टीका केली जात आहे. चॅम्पियन्स वनडे कप झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. या मालिकेत पाकिस्तानचा संघ दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com