सध्या टिव्हीवर अनेक शो येत असतात. काही नागरिक त्यांचे फेव्हरेट शो पाहण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. याबरोबर टिव्हीवरील लहान मुलांच्या शोला नेहमीच प्रेक्षकवर्गाची खूप पंसती मिळत असते. टिव्ही पडद्यावर असलेली ही लहान मुले त्यांच्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकत असतात. असाच एक कार्यक्रम स्टार प्रवाह चॅनेलवर सुरु होता.
स्टार प्रवाह चॅनेलवरील हा कार्यक्रम 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३' हा होता. या कार्यक्रमात अनेक लहान मुलांनी सहभाग घेतला होता. याबरोबर या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम आणि चांगला प्रतिसाद दिला होता. सध्या या कार्यक्रमाचा काल महाअंतिम सोहळा आनंदात आणि जल्लोषात पार पडला आहे.
'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३' या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत सहा छोटे कलाकार सहभागी होते. याबरोबर या सहा छोट्या उस्तांमध्ये सुरांची बाजी सुरु होती. या सहा उस्तांमध्ये जुई चव्हाण,पलाक्षी दीक्षित, देवांश भाटे,स्वरा किंबहुने आणि गीत बागडे, सारंग भालके सामील होते. पण या कार्यक्रमाची महाविजेती यवतमाळची गीत बागडे झाली आहे. तिने सुरांची बाजी मारत हे विजेतेपद मिळवले आहे.
कार्यक्रमाची विजेती ठरलेल्या गीत बागडेला खूप आनंद झाला आहे. गीतने आपला आनंद सगळ्यांसमोर व्यक्त केला आहे. तिचे असे म्हणने आहे की, मी बाबांच्या पाठिंब्यामुळे ही स्पर्धा जिंकलेली आहे. स्टार प्रवाह मंचाने मला खूप काही दिले आहे. या मोठ्या मंचातून मला आत्मविश्ववासाबरोबर खूप काही गोष्टी शिकाल्या मिळाल्या आहेत. याबरोबर गीतने मार्गदर्शक आणि सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश विश्वजीत सर यांचे खूप आभार मानले आहे. याबरोबर तिने मंचावरील सर्व गुरुंचे ही खूप आभार मानले आहे. शेवटी गीत बागडेला तिच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे ती स्टार प्रवाह मंचाची खूप ऋणी आहे.