Ms Dhoni on Loss: हातचा सामना निसटल्याने धोनी संतापला,'या' खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर

IPL 2023 GT VS CSK Ms Dhoni: या सामन्यानंतर एमएस धोनीने पराभवाचं कारण सांगितलं आहे.
Ms Dhoni
Ms DhoniSaam Tv
Published On

IPL 2023 Match 1 Result GT VS CSK : आयपीएल २०२३ स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला ५ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या १७९ धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने ४ चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला.

दरम्यान या सामन्यानंतर एमएस धोनीने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

Ms Dhoni
GT vs CSK IPL Match: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची झुंजार खेळी, शतक हुकलं; चेन्नईचे गुजरातला १७९ धावांचे आव्हान

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनीने सामना झाल्यानंतर म्हटले की, "आम्हाला माहीत होतं की, खेळपट्टीवर दव असणार असणार. आम्ही फलंदाजीत आणखी धावा करू शकलो असतो. ऋतुराज गायकवाडने अप्रतिम फलंदाजी केली. तो ज्याप्रकारे चेंडू टाईम करत होता ते पाहून बरं वाटलं. ज्याप्रकारे तो फलंदाजीत पर्याय शोधतो ते खरचं कौतुकास्पद आहे."

तसेच धोनीने पदार्पण करत असलेल्या राजवर्धन हंगरगेकरबद्दल बोलताना म्हटले की, "मला वाटतं की, राजवर्धन हंगरगेकडे गती आहे आणि जसजसा वेळ पुढे जाईल तशी तो चांगली कामगिरी करेल. मात्र नो चेंडू टाकणं कसं टाळायचं हे आपल्या हातात आहे. त्यावर त्याला काम करावं लागेल." (Latest sports updates)

Ms Dhoni
Young Players In IPL: IPL 2023 स्पर्धेत 'हे' 10 युवा खेळाडू घालणार धुमाकूळ ! एक तर ख्रिस गेलला देतोय टक्कर

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, गुजरातने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली. तर मोईन अलीने २३ धावांची खेळी केली.

या खेळीच्या जोरावर चेन्नईने १७८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना शुभमन गिलच्या ६३ धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरातने ५ गडी राखून विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com