MS Dhoni : महेंद्र सिंह धोनीला दुखापत? चेन्नईच्या सामन्यानंतर व्हिडिओ व्हायरल, क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढली

MS Dhoni Latest News : महेंद्र सिंह धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी लंगडताना दिसत आहे. धोनीचा लंगडताना व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
MS Dhoni Health Update
MS Dhoni Health Updatesaam tv

MS Dhoni IPL 2024 :

आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत तीन सामने गमावले आहेत. परंतु चेन्नईच्या तिसऱ्या सामन्यात चाहत्यांना धोनीची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. त्याने मैदानात चौकार-षटकारांचा वर्षाव केला. याचदरम्यान, महेंद्र सिंह धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी लंगडताना दिसत आहे. धोनीचा लंगडताना व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

महेंद्र सिंह धोनी दुखापतग्रस्त?

धोनीचा गेल्या दोन दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार धोनी लंगडताना दिसत आहे. चेन्नईच्या तिसऱ्या सामन्यानंतरचा व्हिडिओ असल्याचा माहिती मिळत आहे.

या व्हिडिओमध्ये धोनीच्या स्नायूमध्ये दुखापत झाल्याचे दिसत आहे. तसेच त्याने त्या भागावर आइस कॅप लावल्याचे पाहायला मिळत आहे. धोनीला चालतानाही अडचणी येत आहे. या व्हिडिओनंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. चाहत्यांना महेंद्र सिंह धोनीकडून खूप अपेक्षा असल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे.

MS Dhoni Health Update
RCB १६ वर्षात एकदाही IPL विजेता का नाही? ६ वेळा आयपीएल चॅम्पियन खेळाडू अंबाती रायडूनं सांगितलं कारण

तिसऱ्या सामन्यात धोनीची उत्तम कामगिरी

चेन्नईने दुसऱ्या सामन्यात धोनीने स्फोटक फंलदाजी केली. या स्फोटक फलंदाजीची जोरदार चर्चा होत आहे. धोनीने या डावात चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. या सामन्यात धोनीने १६ चेंडूत नाबाद ३७ धावांची खेळी खेळली. धोनीने शेवटच्या षटकात दोन चौकार आणि दोन षटकार लगावत २० धावा केल्या. मात्र, चेन्नई सुपर किंग संघ २० धावांनी पराभूत झाला.

MS Dhoni Health Update
Nicholas Pooran Six: पुरनने खेचला IPL 2024 स्पर्धेतील सर्वात लांब षटकार! चेंडू थेट मैदानाबाहेर- Video

दिल्ली कॅपिटल्स संघाची फलंदाजी ठरली यशस्वी

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत आणि अनुभवी सलामीवीर डेविड वार्नरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ५ गडी गमावून १९१ धावा कुटल्या. पंतने ३२ चेंडूत ५१ धावा केल्या. तर वार्नरने ३५ चेंडूत ५२ धावा कुटल्या. सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने २७ चेंडूत ४३ धावा कुटल्या. पंतने या हंगामातील पहिलं अर्धशतक ठोकलं. चेन्नईसाठी मथिशाने ३१ धावा देऊन ३ गडी बाद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com