Nicholas Pooran Six: पुरनने खेचला IPL 2024 स्पर्धेतील सर्वात लांब षटकार! चेंडू थेट मैदानाबाहेर- Video

RCB vs LSG, IPL 2024: या संघाकडून फलंदाजी करताना क्विंटन डीकॉकने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर शेवटी निकोलस पुरनने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
nicholas pooran six
RCB vs LSG, Nicholas pooran hits 105 meter six in Royal challengers bangalore vs lucknow super giants match twitter

RCB vs LSG, Nicholas Pooran Six:

एम चिन्नास्वामीच्या मैदानावर निकोलस पुरनची बॅट चांगलीच तळपली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकत लखनऊ सुपर जायंट्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. या संघाकडून फलंदाजी करताना क्विंटन डीकॉकने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर शेवटी निकोलस पुरनने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

निकोलस पुरनचा गगनचुंबी षटकार...

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या लखनऊ सुपरजायंट्स संघाकडून निकोलस पुरन पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. या डावात त्याला केवळ २१ चेंडू खेळण्याची संधी मिळाली. या २१ चेंडूंमध्ये त्याने १ चौकार आणि ५ गगनचुंबी षटाकारांसह ४० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने एक गगनचुंबी षटकार मारला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे. (Cricket news in marathi)

nicholas pooran six
RCB vs LSG, LIVE: डीकॉकची वादळी सुरुवात अन् पुरनचा फिनिशिंग टच! लखनऊचे RCB समोर विजयासाठी १८२ धावांचे आव्हान

तर झाले असे की, लखनऊ सुपरजायंट्स संघाची फलंदाजी सुरु असताना १९ वे षटक टाकण्यासाठी रिस टॉप्ली गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिला चेंडू निर्धाव राहिला. तर पुढील चेंडू वाईड आणि त्यानंतर पुढील ३ चेंडूंवर निकोलस पुरनने सलग ३ षटकार मारले. यापैकी तिसरा षटकार हा थेट मैदानाबाहेर गेला. हा षटकार १०६ मीटर लांब असून आयपीएल २०२४ संयुक्तरित्या सर्वात लांब षटकार आहे.

लखनऊने केल्या १८१ धावा...

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल आणि क्विंटन डीकॉकची जोडी मैदानावर आली होती. दोघांनी मिळून संघासाठी ५३ धावा जोडल्या. केएल राहुल २० धावा करत माघारी परतला. तर क्विंटन डीकॉकने ५६ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. शेवटी निकोलस पुरनने २१ चेंडूंचा सामना करत ४० धावा केल्या. या खेळीच्या बळावर लखनऊ सुपरजायंट्स संघाने ५ गडी बाद १८१ धावा केल्या.

nicholas pooran six
Mumbai Indians, IPL 2024: मुंबई इंडियन्समध्ये खरंच २ गट पडलेत का? पराभवानंतर संघातील खेळाडूने केलं उघड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com