

भारताने बुधवारी (२३ ऑगस्ट)इतिहासाला गवसणी घातली आहे. भारताचं चांद्रयान-३ मिशन यशस्वी झालं आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा जगातील पहिलाच देश ठरला आहे. प्रत्येक भारतीयाची छाती ही अभिमानाने फुलली आहे.
दरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने देखील भारताचं चांद्रयान-३ मिशन यशस्वी झाल्यानंतर खास सेलिब्रेशन केलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एमएस धोनी शॉर्ट्स आणि जिम सँडो घालून उभा आहे. अत्यंत शांत पध्दतीने तो चांद्रयान-३ मिशन यशस्वी झाल्याचं सेलिब्रेशन करताना दिसून येत आहे.
तो आपल्या मांडीला थाप देत टाळ्या वाजवताना दिसून येत आहे. तसेच एमएम धोनीची पत्नी साक्षी सिंग धोनीने देखील एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात झिवा धोनी जल्लोष साजरा करताना दिसून येत आहे.
एमएस धोनीसह इतर भारतीय क्रिकेटपटूंनी देखील चांद्रयान-३ मिशन यशस्वी झाल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केलं आहे. (Latest sports updates)
ज्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरपासून ते विराट कोहलीचा समावेश आहे. सचिन तेंडूलकरने ट्विट करत लिहिले की, 'विजयी विश्व तिरंगा प्यारा.. ' तर विराट कोहली ट्विट करत लिहिले की, 'चांद्रयान-३ च्या टीमचे अभिनंदन.. आपल्या देशाचा मान उंचावला आहे..जय हिंद'
भारत हा चंद्रावर जाणारा चौथा देश ठरला आहे. यापूर्वी चीन, रशिया आणि अमेरीकेने चंद्रावर पाऊल ठेवले होते. मात्र चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.