
IPL 2025 च्या एलिमिनेट सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा विजय झाला आहे. तर गुजरात टायटन्स या संघाचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे. विजयामुळे मुंबईचा संघ क्वालिफायर २ साठी पात्र झाला आहे. १ जून रोजी पंजाब किंग्स विरुद्ध असा क्वालिफायर २ सामना पाहायला मिळणार आहे. संपूर्ण सीझनमध्ये चांगली कामगिरी करुनही आयपीएल २०२५ मधून गेल्याने गुजरातचे चाहते नाराज झाले आहेत.
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या एलिमिनेटर सामन्यामध्ये मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकला. पंड्याने टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईचे खेळाडू फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. मुंबई इंडियन्सच्या शिलेदारांनी २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स गमावत २२८ धावा केल्या. २२९ धावांचे लक्ष्य गाठताना गुजरातने ६ विकेट्स गमावत २०६ धावा केल्या.
सलामीसाठी जॉनी बेअरस्टो आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. बेअरस्टो ४७ धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सूर्यकुमार यादवने ३३ धावा केल्या. तिलक वर्मा २२ धावा करुन माघारी परतला. दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा टिकून खेळत होता. त्याने ५० चेंडूंमध्ये ८१ धावा केल्या. नमन धीर लवकर बाद झाला. हार्दिक पंड्याने शेवटच्या ओव्हर्समध्ये दमदार खेळी करत ९ चेंडूत २२ धावा केल्या. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णा आणि साई किशोर यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. २० ओव्हर्सच्या शेवटी मुंबईचा डाव २२८ वर थांबला.
२२९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी गुजरातचे सलामीवीर आले. पहिल्याच ओव्हरमध्ये कर्णधार शुभमन गिल आउट झाला. त्यानंतर साई सुदर्शन आणि कुसल मेंडिस यांनी खेळ सावरला. तोल गेल्याने कुसल मेंडिसचा पाय स्टंपवर गेला आणि तो बाद झाला. मेंडिसनंतर वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीला आला. त्याने ४८ धावा केल्या. ज्या प्रमाणे मुंबईसाठी रोहित खिंड लढवत होता, तसाच साई सुदर्शन गुजरातकडून लढत होता. त्याने ४९ चेंडूत ८० धावा केल्या. रुदरफोर्डने २४ धावा केल्या. राहुल तेवतिया आणि शाहरुख खान यांना गुजरातला विजयी बनवता आले नाही.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -
रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन
गुजरात टायटन्सची प्लेईंग ११ -
शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुसल मेंडिस, शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, साई किशोर, गेराल्ड कुत्सिया, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.