
MI Vs GT Eliminator IPL 2025 : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा आयपीएल २०२५ मधला एलिमिनेटर सामना मुल्लानपूर येथे रंगला आहे. या सामन्यामध्ये मुंबईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रायन रिकल्टनच्या जागी जॉनी बेअरस्टो हा रोहित शर्मासोबत सलामीसाठी आला. बेअरस्टोने २१३ च्या स्ट्राईक रेटने ४७ धावा केल्या.
रायन रिकल्टनच्या जागी खेळायला आलेल्या जॉनी बेअरस्टो मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करवून दिली. त्याच्यासोबत रोहित शर्मा देखील फॉर्ममध्ये आल्याचे पाहायला मिळाले. सामना मुंबईच्या बाजूला वळत असल्याचे पाहत गुजरातने वेगवान गोलंदाजांच्या ऐवजी फिरकीपटूंना गोलंदाजीसाठी बोलावले. गुजरातच्या या खेळीत बेअरस्टो फसला.
आठव्या ओव्हरमध्ये साई किशोर गोलंदाजी करण्यासाठी आला. पहिल्या चेंडूवर बेअरस्टो २ धावा केल्या. तोपर्यंत मुंबईने ८४ धावांची सलामी भागीदारी केली होती. दुसऱ्या चेंडूवर बेअरस्टोने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. बॉल बॅकवर्ड पॉईंटच्या पलिकडे गेला आणि साई सुदर्शनने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हाताच्या स्पर्शाने चेंडूची दिशा बदलली. जेराल्ड कोएत्झीने चेंडू पकडून बेअरस्टोला बाद केले.
मुंबईची प्लेईंग ११ -
रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन
गुजरातची प्लेईंग ११ -
शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुसल मेंडिस, शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, साई किशोर, गेराल्ड कुत्सिया, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.