WPL FINAL 2023: अंतिम सामन्यात दिल्लीचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ११

MI VS DC Toss Update: विमेन्स क्रिकेट लीग २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्याला प्रारंभ झाला आहे.
MI Vs Delhi WPL 2023
MI Vs Delhi WPL 2023 Saam tv
Published On: 

MI-W VS DC-W FINAL Live Updates: विमेन्स क्रिकेट लीग २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्याला प्रारंभ झाला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु आहे.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

MI Vs Delhi WPL 2023
WPL 2023: आयपीएल पूर्वीच दिल्लीचा संघ रचणार इतिहास! तर हरमनप्रीत करणार धोनीच्या 'या' मोठ्या विक्रमाची बरोबरी

हा सामना जिंकून दोन्ही संघांना इतिहास रचण्याची संधी असणार आहे. कारण हा विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासातील पहिलाच अंतिम सामना आहे.

या सामन्यात दिल्लीची कर्णधार मेग लेनिंग आपल्या दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायजीला पहिले वहिले जेतेपद मिळवून देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर ५ वेळेस आयपीएल जेतेपद मिळवणारी मुंबई इंडियन्स फ्रँचायजी आपला ६ वा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

MI Vs Delhi WPL 2023
DC vs MI WPL 2023 Final : आज रंगणार अंतिम सामन्याचा थरार! कधी, कुठे अन् कसा पाहायचा हे जाणून घ्या?

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

दिल्ली कॅपिटल्स: मेग लेनिंग(कर्णधार), शफाली वर्मा ,एलिस कॅप्सी, जेमिमा रॉड्रिग्ज, मारियान काप, मैन्नु मणी, जेस जोनासन, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया, राधा यादव, शिखा पांडे.

मुंबई इंडियन्स:

हेली मॅथ्युज, यस्टीका भाटिया, नताली सिवर ब्रंट, हरमनप्रीत कौर, एमिलीया कौर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाॅंग, अमनजोत कौर, हुमायरा काजी, जिंतिमनि काजी, साइका इसाक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.