WPL 2023: आयपीएल पूर्वीच दिल्लीचा संघ रचणार इतिहास! तर हरमनप्रीत करणार धोनीच्या 'या' मोठ्या विक्रमाची बरोबरी

WPL 2023 Final: आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये विमेन्स प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना पार पडणार आहे.
MI Vs Delhi WPL 2023
MI Vs Delhi WPL 2023 Saam tv

MI-W VS DC-W FINAL 2023: आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये विमेन्स प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना पार पडणार आहे.

हा सामना आज संध्याकाळी ७:३० वाजता मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडणार आहे. दरम्यान या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला इतिहास रचण्याची तर मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनीच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असणार आहे.

MI Vs Delhi WPL 2023
DC vs MI WPL 2023 Final : आज रंगणार अंतिम सामन्याचा थरार! कधी, कुठे अन् कसा पाहायचा हे जाणून घ्या?

मेग लेनिंगला दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली गेली होती. ही जबाबदारी तिने योग्यरीत्या पार पाडली आहे. दिल्लीचा संघ ८ पैकी ६ समाने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

जर या संघाने आज जेतेपदाला गवसणी घातली. मेग लेनिंग ही दिल्ली कॅपिटल्स संघाला जेतेपद जिंकून देणारी पहिलीच कर्णधार ठरणार आहे. (Latest sports updates)

कारण यापूर्वी आयपीएल स्पर्धेत देखील दिल्ली कॅपिटल्स संघाला जेतेपद मिळवता आले नाहीये.

MI Vs Delhi WPL 2023
MI VS DC Head To Head : हरमनप्रीत की लेनिंग? कोणता संघ आहे WPL Final जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार? पाहा रेकॉर्ड्स

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्स संघ हा अंतिम फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला आहे. मुंबईला अंतिम फेरीत पोहचवण्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने मोलाची भूमिका बजावली आहे.

तिला अंतिम सामन्यात एमएस धोनीच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असणार आहे. आयपीएल स्पर्धेत एमएस धोनी हा जेतेपद मिळवणारा पहिला भारतीय कर्णधार होता.

आता हरमनप्रीत कौरकडे विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेचे जेतेपद मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णधार बनण्याची संधी असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com