लिजेंड्स लीग २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना मणिपाल टायगर्स आणि अर्बनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात हरभजन सिंगचा मणिपाल टायगर्स संघ सुरेश रैनाच्या अर्बनरायझर्स हैदराबाद संघावर भारी पडला आहे.
या सामन्यात मणिपाल टायगर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अर्बनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटक अखेर ५ गडी बाद १८७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मणिपाल टायगर्स संघाने १९ षटकात हे आव्हान पूर्ण केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं.
अंतिम सामन्यात असेला गुणरत्ने हा मणिपाल संघासाठी विजयाचा हिरो ठरला. त्याने २९ चेंडूत ५ षटकारांच्या साहाय्याने ५१ धावांची आक्रमक खेळी केली. ये खेळीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
हरभजनच्या संघाला चाडविक वाल्टन आणि रॉबिन उथप्पाने सलामीला येत चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. उथप्पाने ४० तर चाडविकने २९ धावा केल्या. अँजेलो परेराने ३० तर थिसारा परेरा २५ धावा करत बाद झाला. हैदराबादकडून गोलंदाजी करताना स्टुअर्ट बिन्नी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सर्वाधिक ३ गडी बाद केले. (Latest sports updates)
अर्बनरायझर्स संघाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, रिकी क्लार्क आणि गुरकिरत सिंगने तिसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. यादरम्यान क्लार्कने आक्रमक खेळ करत ८० धावा चोपल्या. तर गुरकिरत सिंगने ६४ धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीच्या बळावर अर्बनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटक अखेर १८७ धावा केल्या होत्या. मात्र या संघाला जेतेपद पटकावता आलं नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.