Robin Uthappa Batting: 6,6,6,6,6,6..रॉबिन उथप्पाचा विषये का! अवघ्या ३६ चेंडूंमध्ये ठोकल्या नाबाद ८८ धावा

T-10 League 2023: झिम्बाब्वेमध्ये टी -१० लीग स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत रॉबिन उथप्पाने आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले आहे.
robin uthappa
robin uthappa saam tv
Published On

Robin Uthappa Batting In T-10 League: झिम्बाब्वेमध्ये टी -१० लीग स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत रॉबिन उथप्पाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हरारे हेरिकेन्स संघाने एलिमिनेटरच्या सामन्यात केपटाऊन सॅम्प आर्मी संघावर ९ गडी राखून विजय मिळवला आहे.

या सामन्यात रॉबिन उथप्पाने बहुमूल्य खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याने केवळ ३६ चेंडूंचा सामना करत ६ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ८८ धावा केल्या आहेत.

या सामन्यात केपटाऊन संघाने प्रथम फलंदाजी करताना हरारे हेरिकेन्स संघासमोर विजयासाठी १४६ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान हरारे हेरिकेन्स संघाने ९.२ षटकात पूर्ण करत जोरदार विजय मिळवला आहे.

robin uthappa
IND vs WI 2nd ODI Playing 11: दुसऱ्या वनडेत टीम इंडियाची ओपनिंग जोडी बदलणार? रोहितसोबत हा खेळाडू उतरणार मैदानात; पाहा प्लेइंग ११

केपटाऊन संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १० षटक अखेर ३ गडी बाद १४५ धावा केल्या होत्या. यादरम्यान गुरबाजने ६२ धावांची खेळी केली. तर राजपक्षेने ताबडतोड २५ धावा ठोकल्या. त्यानंतर सिन विलियन्सने आक्रमक खेळी करत २८ धावा ठोकल्या.

या धावांचा यशस्वी पाठलाग करत हरारे संघाने ९.२ षटकात हे आव्हान पूर्ण केले. या सामन्यात कर्णधार रॉबिन उथप्पा विजयाचा हिरो ठरला. त्याने ३६ चेंडूंचा सामना करत नाबाद ८८ धावा केल्या. यादरम्यान त्याने ८ चौकार आणि ६ षटकार मारले.

तर एविन लुईसने ६ चेंडूंचा सामना करत १२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १ चौकार आणि १ षटकार मारला. तर डोनावोन फेरेराने १६ चेंडूंमध्ये नाबाद ३५ धावांची खेळी करत हरारे संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. (Latest sports updates)

robin uthappa
IND vs WI 2nd ODI: भारत - वेस्टइंडीज दुसरा वनडे सामना होणार रद्द? मोठं कारण आलं समोर

टी-१० लीग स्पर्धेतील क्वालिफायरचा पहिला सामना डर्बन कलंदर्स आणि जोबर्ग या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात जोबर्ग संघाने विजय मिळवला. यासह स्पर्धेच्या अंतिम फेरित प्रवेश केला आहे. तर पराभूत झालेला डर्बन कलंदर्स संघ दुसऱ्या क्वालिफायरसाठी पात्र ठरला आहे.

एलिमिनेटरचा सामना हरारे आणि केपटाऊन या दोन्ही संघामध्ये पार पडला. केपटाऊनचा संघ स्पर्धेतुन बाहेर पडला आहे. तर हरारेचा संघ क्वालिफायर २ खेळण्यास पात्र ठरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com