- रणजित माजगावकर
Kolhapur : राजर्षी शाहू महाराज (rajarshi shahu maharaj) यांच्या स्मृती शताब्दी निमित्त कोल्हापुरात (kolhapur) महिलांची पहिली महाराष्ट्र कुस्ती (mahila maharashtra kesari kusti spardha in kolhapur) स्पर्धा राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यात ही कुस्ती स्पर्धा होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे.
कोल्हापुरात होणारी स्पर्धा अधिकृत असल्याचा दावा दीपाली सय्यद यांनी केला आहे. इतर जिल्ह्यात होत असलेल्या स्पर्धा ही अनधिकृत असल्याचेही दीपाली सय्यद यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या कोल्हापुरात पहिली शासनमान्य महाराष्ट्र केसरी महिला स्पर्धा होणार आहे.
ही स्पर्धा घेण्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे सय्यद यांनी नमूद केले. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ही स्पर्धा काेल्हापूरात होईल अशी माहिती स्पर्धेच्या आयोजक दीपाली सय्यद आणि खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
दरम्यान सय्यद यांच्या दाव्याने सांगलीत हाेणारी स्पर्धा अधिकृत की अनधिकृत असा वाद निर्माण झाला आहे. (Breaking Marathi News)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.