Katraj New Tunnel : कात्रज नवीन बाेगदा वाहतुकीसाठी राहणार बंद, मुंबईला जाण्यासाठी जाणून घ्या पर्यायी मार्ग (पाहा व्हिडिओ)

वाहतुकदारांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
new katraj tunnel, satara mumbai road, vehicles
new katraj tunnel, satara mumbai road, vehiclessaam tv

New Katraj Tunnel News : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी कात्रजच्या नवीन बोगदा मार्ग वाहतुकीसाठी मार्च महिन्यात दाेन वेळा बंद राहणार (mumbai bound traffic on satara highway to face 6 hour closure on two days) असल्याचे कळविले आहे. वाहतुकदारांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन कदम यांनी केले आहे. (Breaking Marathi News)

new katraj tunnel, satara mumbai road, vehicles
Kolhapur : दानपेटीत दान टाका, प्रसाद थेट आई अंबाबाईच्या चरणी... पूजकाचा Video Viral

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक १८ मार्च रोजी रात्री ११ ते १९ मार्च रोजी पहाटे २ वाजेपर्यंत तसेच २३ मार्च रोजी रात्री ११ वाजल्यापासून २४ मार्च रोजी पहाटे २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

new katraj tunnel, satara mumbai road, vehicles
Vijay Taad News: भाजप नगरसेवकाची दिवसाढवळ्या गाेळ्या झाडून हत्या, कार अडवली अन्... सांगोला रस्त्यावर थरार

या कालावधीत या रस्त्यावरील वाहतूक जुना कात्रज बोगदा मार्ग कात्रज चौक, नवले पुल, विश्वास हॉटेलपासून सेवा रस्त्यावरुन मुंबईकडे वळविण्यात येणार आहे. मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक ही नेहमीप्रमाणेच सुरू राहणार आहे.

व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन कात्रज बोगद्याची साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com