KL Rahul Wicket: अर्रर्रर्रर्र....! चेंडू सोडला अन् बेल्स उडाल्या, केएल राहुलची विचित्र विकेट

KL Rahul Wicket: भारत ए विरूद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यात सामना खेळवला जातोय. ज्या पद्धतीने के.एल राहुल आऊट झाला त्यामुळे सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत.
KL Rahul Wicket
KL Rahul Wicketsaam tv
Published On

न्यूझीलंडनंतर टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. २२ तारखेपासून या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार असून पर्थमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान यापूर्वी भारत ए विरूद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यात सामना खेळवला जातोय.

टीम इंडियाची परिस्थिती बिकट

या सामन्यात देखील टीम इंडियाची परिस्थिती बिकट आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात लोकेश राहुल १० रन्सवर बोल्ड झाला. दरम्यान ज्या पद्धतीने के.एल राहुल आऊट झाला त्यामुळे सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत.

KL Rahul Wicket
Suryakumar Yadav: मी काय बोलणार त्याच्याविषयी…; रोहित शर्माच्या कर्णधारपदाविषयी विचारताच असं का म्हणाला सूर्या?

के.एल राहुलला पहिल्या डावात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. यामुळे दुसऱ्या डावात राहुल चांगला संयम दाखवत होता. मात्र ४४ बॉल्समध्ये १० रन्स करत त्याला माघारी परतावं लागलं. या सामन्यातील दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा स्पिनर कोरी रोचिसिओलीने लाजिरवाण्या पद्धतीने बोल्ड केलं.

टीम इंडिया ए चा पहिला डाव १६१ रन्सवर गुंडाळणाऱ्या ऑस्ट्रेलिया ए संघालाही पहिल्या डावात फारसा चांगला खेळ करता आला नाही. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २२३ रन्स करता आले. हॅरिसच्या ७४ रन्सच्या खेळीला जिमी पिर्सन (३०), कोरी रॉचिसिओली (३५) आणि नॅथन मॅकअँड्य्रू ( २६*) यांनी साथ दिली. भारताच्या प्रसिद्ध कृष्णा ( ४ विकेट्स),मुकेश कुमार (३) व खलील अहमद ( २) यांनी चांगला मारा केला. यावेळी भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने ४ विकेट्स घेतल्या.

KL Rahul Wicket
Rohit Sharma: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, १८ वर्षांनंतर खेळवणार खास टूर्नामेंट

केएल राहुल बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळणार का?

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील्या पाच सामन्यांच्या टेस्ट सिरीजला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सामन्याला रोहित शर्मा मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकेश राहुल आणि अभिमन्यू ईश्वरन यांचा ओपनर म्हणून विचार सुरू आहे. पण हे सामने पाहिले तर दोन्ही खेळाडूंना चांगली कामगिरी करता आलेली नाही. शिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला या सिरीजमधील ४ टेस्ट सामने जिंकावे लागणार आहेत.

KL Rahul Wicket
Cricket news: 'या' वरिष्ठ खेळाडूकडून निवृत्तीची घोषणा; चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वनडेला ठोकणार रामराम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com