KKR vs LSG Match Result: ज्युनियर पाठोपाठ सिनियर पंड्या प्लेऑफमध्ये!रिंकूची झुंजार खेळी व्यर्थ; पाहा प्लेऑफचं समीकरण

IPL 2023 Playoff Scenario: पराभूत झालेला कोलकता नाईट रायडर्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.
kkr vs lsg
kkr vs lsgtwitter

KKR VS LSG IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धा आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचली आहे. स्पर्धेतील ६८ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने जोरदार कामगिरी करत १ धावेने विजय मिळवला आहे. यासह आयपीएल २०२३ स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये देखील प्रवेश केला आहे.

दरम्यान पराभूत झालेला कोलकता नाईट रायडर्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.

kkr vs lsg
IPL 2023 Playoffs Race: मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी एकच मार्ग शिल्लक! रोहित सेनेला करावं लागेल हे काम

लखनऊ सुपर जायंट्सने केल्या १७६ धावांचा डोंगर..

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटक अखेर ८ गडी बाद १७६ धावा केल्या होत्या.

लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून निकोलस पुरनने आक्रमक खेळी करत ३० चेंडू चेंडूंचा सामना करत ५८ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. तर क्विंटन डी कॉकने २ षटकारांच्या साहाय्याने २८ आणि प्रेरक मांकडने २० चेंडूंचा सामना करत २६ धावांची खेळी केली.

रिंकूची खेळी व्यर्थ..

कोलकाता नाईट रायडर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून जेसन रॉयने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली.

या खेळी दरम्यान त्याने ७ चौकार आणि १ षटकार मारला. तर वेंकटेश अय्यरने २४ धावांची खेळी केली. शेवटी रिंकू सिंगने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत नाबाद ६७ धावांची खेळी केली. मात्र कोलकाता नाईट रायडर्स संघ विजयापासून १ धाव दूर राहिला. (Latest sports updates)

kkr vs lsg
Net Run Rate: IPL चा नेट रन रेट कसा काढतात?

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

कोलकाता नाईट रायडर्स :

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

लखनऊ सुपर जायंट्स :

क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), करण शर्मा, प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, कृणाल पांड्या (कर्णधार), आयुष बडोनी, कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com