Kane Williamson: पहिल्याच सामन्यात गुजरातला मोठा धक्का! संघातील प्रमुख फलंदाज संपूर्ण हंगामातून बाहेर..

Kane Williamson Ruled Out Of IPL 2023: मात्र सामना झाल्यानंतर गुजरात टायटन्स संघाला मोठा धक्का बसला आहे.
Kane Williamson
Kane Williamson Twitter
Published On: 

IPL 2023 GT VS CSK Match 1: शुक्रवारी आयपीएल २०२३ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. स्पर्धेतील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

या सामन्यात गुजरातने जोरदार कामगिरी करत ५ गडी राखून विजय मिळवला. मात्र सामना झाल्यानंतर गुजरात टायटन्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

Kane Williamson
PBKS VS KKR Record: IPL चे दोन नवीन कर्णधार आज येणार आमने-सामने! कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

गुजरात टायटन्स संघातील अनुभवी फलंदाज केन विलियमसन हा आयपीएल २०२३ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाहीये. पहिल्याच सामन्यात सीमारेषेवर त्याने उत्तम क्षेत्ररक्षण केले होते.

६ धावांसाठी जात असलेला चेंडू त्याने उंच उडी मारत अडवला आणि संघासाठी २ धावा वाचवल्या. मात्र चेंडू अडवल्यानंतर त्याला तोल सावरता आला नाही. त्यामुळे तो दुखापतग्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले होते. (Kane Williamson Ruled Out Of IPL 2023)

Kane Williamson
GT vs CSK IPL Match Highlights: गुजरात टायटन्सने जिंकून दाखवलं; स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चेन्नईचा पराभव

हा झेल जर त्याने यशस्वीरित्या टिपला असता तर कदाचित या हंगामातील हा सर्वोत्तम झेल ठरला असता. मात्र आता याच झेलमुळे त्याला आयपीएल स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे.

त्याच्या ऐवजी साई सुदर्शनचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र साई सुदर्शनला हवी तशी कामगिरी करता आली नाही.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, गुजरातने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. (Latest sports updates)

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली. तर मोईन अलीने २३ धावांची खेळी केली.

या खेळीच्या जोरावर चेन्नईने १७८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना शुभमन गिलच्या ६३ धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरातने ५ गडी राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.