Johnson Charles Century: ११ षटकार अन् १० चौकारांसह चार्ल्सची वादळी खेळी! ३९ चेंडूंमध्ये शतक झळकावत मोडले मोठे रेकॉर्ड्स

Johnson Charles Fastest Century: दुसऱ्या टी -२० सामन्यात वेस्ट इंडिजचा फलंदाज जॉनसन चार्ल्सने वादळी खेळी करत इतिहास रचला आहे.
Johnson Charles
Johnson CharlesTwitter
Published On: 

SA vs WI 2nd T20I: दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या टी -२० सामन्यात वेस्ट इंडिजचा फलंदाज जॉनसन चार्ल्सने वादळी खेळी करत इतिहास रचला आहे.

त्याने आपल्या टी -२० कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज संघासाठी शतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला आहे.

Johnson Charles
WPL 2023: आयपीएल पूर्वीच दिल्लीचा संघ रचणार इतिहास! तर हरमनप्रीत करणार धोनीच्या 'या' मोठ्या विक्रमाची बरोबरी

जॉनसन चार्ल्सने तुफानी खेळी करत अवघ्या ३९ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने ९ चौकार आणि ९ षटकार मारले. त्याने या खेळीदरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. (Latest sports updates)

शेवटी तो ४६ चेंडूंमध्ये ११८ धावांची खेळी करून माघारी परतला. मार्को जान्सेनने त्याला बाद करत माघारी धाडले. जर तो बाद झाला नसता तर त्याने आणखी काही रेकॉर्डस् मोडून काढले असते.

Johnson Charles
DC vs MI WPL 2023 Final : आज रंगणार अंतिम सामन्याचा थरार! कधी, कुठे अन् कसा पाहायचा हे जाणून घ्या?

दोन्ही संघांची प्लेइंग ११:

वेस्ट इंडीज - काइल मेयर्स, ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल (कर्णधार ), जेसन होल्डर, रॅमन रेफर, रोमॅरियो शेफर्ड, अकिल होसेन, ओडियन स्मिथ, शेल्डन कॉट्रेल

दक्षिण आफ्रिका - क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, रिले रॉसौ, एडन मार्कराम (कर्णधार), डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, मार्को जान्सेन, वेन पारनेल, सिसांडा मागाला, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.