Cricket News: इशान अन् श्रेयसला 'ती' चूक पडणार महागात; BCCI करार रद्द करण्याच्या तयारीत

BCCI Action : देशांतर्गत क्रिकेटकडे पाठ फिरवणाऱ्या इशान आणि श्रेयस यांना बीसीसीआय केंद्रीय करारातून वगळणार असल्याचे चिन्ह मिळत आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने काही दिवसांपूर्वी २०२३-२४च्या करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केलीय.
Ishan Kishan and Shreyas Iyer
Ishan Kishan and Shreyas IyerSaam Tv
Published On

Ishan Kishan and Shreyas Iyer BCCI central contracts :

इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर बीसीसीआय मोठी कारवाई करणार असल्याची शक्यता आहे. या दोन्ही खेळांडूची एक चूक त्यांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर संपण्यास कारणीभूत ठरू शकते. बीसीसीआयकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सूचना वारंवार केल्या गेल्या परंतु या सुचनांकडे दुर्लक्ष करणं श्रेयस अय्यर आणि इशान किशनला महागात पडण्याची शक्यता आहे. देशांतर्गत क्रिकेटकडे पाठ फिरवणाऱ्या इशान व श्रेयस यांना बीसीसीआय केंद्रीय करारातून वगळणार असल्याचं सांगितलं जात आहे.(Latest News)

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून मानसिक थकवा सांगून दौऱ्यातून सुट्टी मागणारा इशान किशनने ( Ishan Kishan)देशांतर्गत क्रिकेट खेळलेला नाही. इशानला वारंवार सूचना देऊनही त्याने त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. अशीच चूक श्रेयस अय्यरकडूनही ( Shreyas Iyer) झाली. तंदुरुस्त असूनही तो आजपासून सुरू झालेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईकडून खेळला नाहीये. त्यामुळे आता बीसीसीआय BCCI त्यांच्याविरोधात मोठी कारवाई करणार असल्याचं संकेत मिळत आहेत.

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने काही दिवसांपूर्वी २०२३-२४च्या करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केलीय. इशान आणि श्रेयस हे दोघंही रणजी करंडक स्पर्धेतील एकही सामना खेळलेले नाहीत. आफ्रिका दौऱ्यावरून माघारी परतल्यानंतर इशान काहीकाळ नॉट रिचेबल होता. श्रेयसला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापासून वगळले गेले.

श्रेयसने पाठ दुखीचं कारण सांगितलं परंतु बीसीसीआयने तोपर्यंत मेडिकल बुलेटिन दिलं नव्हतं. पण राहुल द्रविड, अजित आगरकर आणि जय शाह यांनीही खेळाडूंना रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला होता. इशान आणि श्रेयस दोघांनीही या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे BCCI आता कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com