

मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये ब्रिटिश नागरिकाचा मृत्यू
इयान विलियम्स लँकफोर्ड असे मृत व्यक्तीचे नाव
मरीन ड्राइव्ह पोलिसांकडून तपास सुरू
आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यादरम्यान भयंकर घटना उघडकीस आली आहे. आयपीएल स्पर्धेचा ब्रॉडकास्ट इंजिनीअर असलेल्या ब्रिटिश नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जॅन विलियम्स लँकफोर्ड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ७६ वर्षीय इयान यांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे.
आयपीएस सामन्यांचं कव्हरेज करण्यासाठी इयान हे २४ मार्चपासून ट्रायडेंट हॉटेलमध्ये वास्तव्यात होते. त्यांना ३० मार्च रोजी सकाळी रिसेप्शनने कॉल केला. त्यावेळी त्यांच्याकडून कोणतीही उत्तर मिळालं नाही. त्यानंतर स्टाफ त्यांच्या रुममध्ये पोहोचला. त्यावेळी ते रुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने डॉक्टरकडे नेले. परंतु डॉक्टरांनी जॅन यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जॅन यांच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळून आलेली नाही. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांकडून ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद (ADR) करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. संबंधित ब्रिटिश नागरिक गेल्या काही दिवसांपासून ट्रायडेंट हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इयान विलियिम्स लँगफोर्ड हे २९ मार्च रोजी त्यांच्या रुममध्ये आले. रिसेप्शनने ३० मार्च रोजी कॉल केला, परंतु त्यांच्याकडून कोणतंही प्रत्युत्तर मिळालं नाही. हॉटेलचा स्टाफ त्यांच्या रुममध्ये पोहोचला. त्यानंतर रुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर हॉटेल प्रशासनाने इन-हाऊस डॉक्टरांना बोलावलं. त्यानंतर या इंजिनीअरला मृत घोषित केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.