
मुंबई : २०२५च्या आयपीएलमध्ये तुफानी फलंदाजी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने अवघ्या १४व्या वर्षी झंझावाती शतक ठोकून सर्वांनाच तोंडात बोटं घालायला लावली. त्याने ३५ चेंडूत १०० धावा केल्या. त्याचे षटकार आणि चौकारांनी मैदानावर त्या दिवशी रासच मांडली. प्रेक्षक म्हणतात या छोकर्याने तर डोळ्याचे पारणे फेडले. पण आता त्याच्याविषयी एक वाद उभा समोर आला आहे. माजी बॉक्सर तथा ऑलम्पिक पदक विजेता विजेंदर सिंह याने त्याच्यावर गंभीर आरोप केला आहे. नेमका तोआरोप काय? वैभववर खरंच कारवाई होणार का? हेच आपण जाणून घेऊया.
बॉक्सर विजेंदर सिंह याने वैभव सूर्यवंशी याची तुफान फटकेबाजी पाहिली. त्यानंतर त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहिली. 'भाई आजकाल काही जण वय लहान करून क्रिकेट खेळत आहेत.' अशी एका ओळीची पोस्ट त्याने लिहिली आहे. ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. काही जण उलट विजेंदर सिंह यालाच सल्ले देत आहेत. त्यांनी वय नको, त्याचे टॅलेंट बघ असा सल्ला विजेंद्रर याला दिला आहे.
वैभव सूर्यवंशी याच्यावर वय लपवल्याचा आरोप या शतकी खेळीनंतर जास्त प्रमाणात करण्यात येत आहे. तो अवघ्या १४ वर्षांचा आहे. पण शरीरयष्टीने तो सदृढ आहे. त्याची फलंदाजी आणि आक्रमक खेळी डोळ्याचे पारणे फेडणारी आहे. तो ९० मीटर षटकार मारत असल्याने त्यावर अनेकांनी सवाल केला आहे. १४ वर्षाच्या मुलाला इतक्या दूरवर चेंडू टोलवता येणं अशक्य असल्याचा दावा अनेक जण करत आहेत. अर्थात भारतीय क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयने (BCCI) त्याच्या वयाची पडताळणी केल्याचा दावा करण्यात आला आहे.
नियम काय सांगतो?
भारतीय खेळाडूंनी वय लपवल्यास, ते खोटे सांगितल्यास बीसीसीआय कडक कारवाई करते. अशा खेळाडूंवर बंदी आणण्यात येते. वयाचा खोटा पुरावा देऊन खेळणाऱ्या खेळाडूंवर दोन वर्षांकरीता बंदी घालण्यात येते. या काळात तो बीसीसीआयने आयोजित केलेल्या कोणत्या टुर्नामेंट अथवा इतर सामन्यात खेळू शकत नाही. यापूर्वी काही भारतीय खेळाडूंवर अशी कारवाई झाल्याचे समोर आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.