

टी२० वर्ल्ड कपनंतर इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा थरार रंगणार आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. आयपीएलची सुरुवात तारीख गेल्या काही काळापासून सस्पेन्सचा विषय होता. आता आयपीएल २०२६ च्या अधिकृत तारखा जाहीर झाल्या आहेत. मार्च २०२६ च्या शेवटच्या आठवड्यापासून या स्पर्धा सुरू होणार आहेत.
स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एका पोस्टमध्ये आयपीएल २०२६ च्या सुरुवातीची तारीख जाहीर केली. ही स्पर्धा २८ मार्च रोजी सुरू होणार आहे. वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही, परंतु आयपीएलच्या सुरुवातीच्या तारखेच्या घोषणेमुळे हे स्पष्ट झाले आहे की काही दिवसांत कोणता संघ आपला पहिला सामना खेळेल हे देखील कळणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार बीसीसीआय दोन वेगवेगळ्या भागात वेळापत्रक जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. आता फक्त टूर्नामेंट कधी सुरू होणार याची तारीख समोर आली आहे.
आयपीएल २०२६ चा पहिला सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार असल्याचे सांगितलं जात आहे. गेल्या वर्षीचा विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल २०२६ चा पहिला सामना खेळेल. आरसीबी घरच्या मैदानावर चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. त्यांनी आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.