Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग ११ मध्ये या ५ खेळाडूंना जागा मिळणं कठीण; हार्दिक पंड्या घेणार मोठे निर्णय

आयपीएल 2026 आधी मुंबई इंडियन्सची टीम मजबूत दिसत असली तरी प्लेइंग 11 निवडणं कर्णधारासाठी मोठं आव्हान ठरणार आहे. संघात अनेक स्टार खेळाडू असल्यामुळे काहींना संधी मिळणं कठीण होऊ शकतं.
Mumbai Indians
Mumbai Indianssaam tv
Published On

आता अवघ्या काही दिवसातच आयपीएलच्या १९ व्या सिझनला सुरुवा होणार आहे. अशातच पाच वेळा विजेतेपद पटकावणारी मुंबई इंडियन्सची टीम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यंदाच्या वर्षी मुंबईची टीम सहाव्या ट्रॉफीसाठी सज्ज झाली असली, तरी गेल्या पाच सिझनपासून टीमच्या हाती केवळ निराशाच आहे. एकेकाळी सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखली जाणारी ही टीम आता पुन्हा जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे.

यंदाच्या ऑक्शनमध्ये मुंबईने काही दमदार खेळाडूंना टीममध्ये सामील करून घेतलंय. मात्र, कागदावर मजबूत दिसणाऱ्या या टीमसमोर खरी कसोटी असेल ती योग्य प्लेइंग 11 निवडण्याची. कर्णधार हार्दिक पंड्याला यावेळी काही मोठे कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत. यावेळी कोणत्या खेळाडूंना टीममध्ये संधी मिळवणं कठीण होणार आहेत ते पाहूयात.

Mumbai Indians
Jasprit Bumrah: BCCI मुळे जसप्रीत बुमराहचं २ कोटींचं नुकसान

शार्दुल ठाकूर

शार्दुल ठाकूरसाठी या सिझनमध्ये प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवणं सोपं नसणार आहे. कारण टीममध्ये आधीच जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहर वेगवान गोलंदाज आहेत. त्यातच हार्दिक पंड्या स्वतः चौथ्या पेसरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे शार्दूल ठाकूरला संधी मिळणं कठीण आहे

रॉबिन मिंज

झारखंडचा युवा विकेटकीपर-बल्लेबाज रॉबिन मिंज यालाही टीममध्ये संधी देण्यात आली आहे. परंतु अनुभवी क्विंटन डी कॉक आणि रायन रिकल्टन सारखे पर्याय उपलब्ध असल्याने मिंजला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणं सोप नसेल.

Mumbai Indians
IPL 2026: IPL सुरू होण्याआधी दारू सोडली, दिग्गज खेळाडूनं एबीसमोर सांगितलं कारण

कॉर्बिन बॉश

दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर कॉर्बिन बॉश हा सध्या बॅकअप पर्याय म्हणून टीममध्ये आहे. कारण मुंबईकडे आधीच विल जॅक्स, मिचेल सॅन्टनर आणि शेरफेन रदरफोर्ड हे परदेशी खेळाडू आहेत.

राज अंगद बावा

राज अंगद बावा हा अंडर-19 वर्ल्ड कपमधील स्टार ऑलराउंडर असला, तरी टीममध्ये हार्दिक पंड्या यांच्यासारखा अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे राजला अजून काही काळ टीममध्ये येण्याची वाट पाहावी लागेल.

Mumbai Indians
IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्जला जबरा झटका, स्टार खेळाडू स्पर्धेतून आऊट, कोण आहे तो?

नमन धीर

गेल्या सिझनमध्ये आक्रमक फलंदाजीने लक्ष वेधणारा नमन धीरला यंदा संधी मिळणार की नाही यावर प्रश्न आहे. कारण मधल्या फळीत विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव हे अनुभवी फलंदाज आहेत. त्यामुळे त्याला प्लेईंग ११ मध्ये जागा मिळणार की नाही हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com