IPL 2025 चा पुनश्च श्रीगणेशा! कोलकाता आणि बंगळूरू भिडणार, काहींनी संघ सोडला; पण मैदानात कोण उतरणार?

RCB Vs KKR : स्थगितीनंतरचा IPL 2025 मधला पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
RCB Vs KKR
RCB Vs KKRX
Published On

भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याने आयपीएल काही दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर १७ मे म्हणजेच आजपासून आयपीएल २०२५ पुन्हा सुरु होईल अशी घोषणा करण्यात आली. स्थगितीनंतर आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स हे दोन संघ आमने सामने येणार आहे. हा सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे.

Pitch Report

IPL 2025 मध्ये एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आतापर्यंत अनेक संघांनी २०० पेक्षा जास्त धावसंख्या केली आहे. याचा अर्थ आज हायस्कोअरिंग सामना पाहायला मिळू शकतो. आजच्या आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यात फलंदाजांचे वर्चस्व राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तरीही नव्या चेंडूमुळे गोलंदाजांना मदत मिळू शकेल असेही म्हटले जात आहे. या मैदानात प्रथम फलंदाजी करताना ४३ वेळा विजय मिळाला आहे, तर रनचेस करणाऱ्या संघाने ५३ वेळा सामना जिंकला आहे.

RCB Vs KKR
शिवरायांनी जसा अफजलखानाचा कोथळा काढला, तसा PM मोदी पाकिस्तानचा कोथळा काढणार - रामदास आठवले

Weather

चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आजच्या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे सामना थांबवला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. सामन्यादरम्यान मैदानावर काळे ढग दिसतील, आकाशात वीजा चमकताना दिसतील. हा सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यताही खूप जास्त आहे.

RCB Vs KKR
Beed Crime : तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू...! बीडमध्ये पुन्हा गुंडाराज, परळीत मारहाण झालेल्या तरुणाने सांगितली आपबिती

Predication

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत आरसीबी आणि केकेआर यांच्यात ३५ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी केकेआरने २० सामने तर आरसीबीने १५ सामने जिंकले आहेत. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या १२ पैकी ८ सामन्यांमध्ये कोलकाताला विजय मिळाला आहे. २०१६ नंतर, आरसीबीने चिन्नास्वामी स्टेडियमवर केकेआरचा पराभव केलेला नाही. तेव्हा आजच्या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RCB Vs KKR
BMW आणि ५ कोटी, बायकोने मागितला हुंडा, वायुसेना महिला अधिकाऱ्याच्या विरोधात नवरा कोर्टात

Probable Playing 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), मयंक अग्रवाल, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, लुंगी एनगिडी, यश दयाल.

कोलकाता नाइट रायडर्स

रहमानउल्ला गुरबाज, सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, रमणदीप सिंग, वैभव अरोरा, हर्षित राणा, एनरिक नोर्टजे, वरुण चक्रवर्ती

RCB Vs KKR
Beed Crime : बीडमधील गुन्हेगारी संपेना! तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण, हादरवणारा व्हिडीओ समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com