
IPL 2025 मधील ५२ वा सामना चिन्नास्वामी स्टेडियवर खेळला गेला. या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फक्त २ धावांनी चेन्नई सुपर किंग्सवर मात केली. विजयासह चेन्नईने पॉईंट्स टेबलवर मोठी झेप घेत पहिले स्थान गाठले. दुसऱ्या बाजूला चेन्नईला सलग चौथ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. सामना संपल्यानंतर 'पराभवासाठी मी कारणीभूत आहे' असे वक्तव्य सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केले.
टॉस जिंकून महेंद्रसिंह धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विराट कोहली आणि जेकॉब बेथल सलामीसाठी मैदानात उतरले. दोघांनी अर्धशतकीय खेळी केली. जेकॉब पाठोपाठ विराटची विकेट पडली आणि सामना चेन्नईकडे झुकला. शेवटच्या ओव्हर्समध्ये रोमारियो शेफर्डने शानदार फलंदाजी करत नाबाद ५३ करत आरसीबीचा डाव २०० पार नेला.
२१४ धावांचे लक्ष्य गाठताना पंधराव्या ओव्हरपर्यंत सीएसकेने १७२ धावा केल्या. त्यानंतर आयुष म्हात्रे ९४ धावा करुन तंबूत गेला. पुढच्याच चेंडूवर डेवॉल्ड ब्रेव्हिस एलबीडब्लू आउट झाला. ब्रेव्हिसच्या जागी फलंदाजीसाठी एमएस धोनी आला. त्याने ८ चेंडूंमध्ये १२ धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये धोनी कॅचआउट झाला. त्याच्याजागी आलेल्या दुबेने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. ७७ धावा करणाऱ्या जडेजालाही विजयी शॉट मारता आला नाही. जडेजा आणि दुबे यांनी पुढील ३ चेंडूमध्ये फक्त ३ धावा काढल्या आणि चेन्नईचा पराभव झाला.
चेन्नईच्या पराभवाला मीच कारणीभूत आहे असे वक्तव्य धोनीने केले. तो म्हणाला, 'मी फलंदाजीसाठी गेलो, तेव्हा काही चेंडूत धावा हव्या होत्या. तेव्हा काही मोठे शॉर्ट्स खेळायला हवे होते, ज्याने दबाव कमी झाला असता. यासाठी मी स्वत:ला दोषी मानतो.' आयुष म्हात्रे आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस यांच्यानंतर धोनी ऐवजी शिवम दुबेने फलंदाजीसाठी यायला हवे होते, असे झाले असते तर सामना चेन्नईने जिंकला असता असे अनेकजण म्हणत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.