
IPL 2025 : कॉर्बिन बॉशने पाकिस्तान सुपर लीग सोडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी दिली. आता आणखी एका खेळाडूने पीएसएल सोडून आयपीएल खेळण्यासाठी तयारी दाखवली आहे. हा खेळाडू दुखापतग्रस्त ग्लेन मॅक्सवेलच्या जागी पंजाब किंग्सकडून खेळणार आहे.
ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल २०२५ मधून माघार घेतल्याने पंजाब किंग्सने त्याच्या जागी मिचेल ओवेन या खेळाडूला संघात सामील केले आहे. मॅक्सवेलप्रमाणे ओवेनही ऑस्ट्रेलियाकडून खेळतो. तो सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहे. ३४ टी-२० सामन्यांमध्ये ओवेनने ६४६ धावा केल्या आहेत. तसेच १० विकेट्सही घेतल्या आहेत. मिचेल ओवेनला पंजाबने ३ कोटींमध्ये करारबद्ध केले.
मिचेल ओवेन पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या पीएसएल या क्रिकेट लीगमध्ये खेळत होता. पेशावर झाल्मी या संघाकडून खेळताना त्याने पीएसएलमध्ये अर्धशतक देखील झळकावले होते. आता पंजाब किंग्सकडून बोलावणे आल्यानंतर ओवेनने पीएसएलला लाथ मारुन आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या एन्ट्रीमुळे पंजाबला फायदा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यादरम्यान पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने ग्लेन मॅक्सवेलच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले. या दुखापतीमुळे तो आयपीएल २०२५ मधून बाहेर पडल्याची माहिती अय्यरने दिली. या सीझनमध्ये मॅक्सवेल चांगल्या फॉर्ममध्ये नव्हताच, त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये खराब कामगिरी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.