'जेल जर्सी' नेमकी आहे तरी काय? ती दाखवून RCB च्या चाहत्यांनी CSK ची खिल्ली उडवली; Video व्हायरल

RCB Vs CSK IPL 2025 : चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर जेल जर्सी विकत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे चाहते चेन्नई सुपर किंग्सचा संघ आणि त्यांच्या चाहत्यांंची खिल्ली उडवली. सोशल मीडियावर या प्रकरणाचे अनेक फोटो, व्हिडीओ पाहायला मिळत आहेत.
RCB Vs CSK IPL 2025
RCB Vs CSK IPL 2025 X
Published On

IPL 2025 मधला ५२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये रंगला आहे. बंगळुरूचा संघ सध्या पॉईंट्स टेबलवर तिसऱ्या स्थानी आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणे आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला चेन्नईचा संघ आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला आहे. सीएसकेचा विजय झाल्यास आरसीबीच्या अडचणी वाढतील असे म्हटले जात आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. आयपीएल २०२४ मध्ये बंगळुरूने चेन्नईचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न मोडले होते. तेव्हापासूनच बंगळुरू-चेन्नई यांच्यातील संघर्ष वाढत गेला. आयपीएल २०२५ मध्येही हा संघर्ष पाहायला मिळाला. चेपॉकमध्ये सीएसके विरुद्ध आरसीबी सामन्याच्या वेळेस दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये गरमागरमी झाल्याचे पाहायला मिळाले होते.

RCB Vs CSK IPL 2025
CSK ला हरवलं तरीही RCB ला मिळणार नाही प्लेऑफचं तिकीट; १६ गुण मिळाले तरी फायदा नाही, कसं आहे क्वालिफायचं गणित?

आज बंगळुरूच्या घरच्या स्टेडियमवर आरसीबी आणि सीएसके आमनेसामने आले आहेत. या सामन्याच्या पूर्वी बंगळुरूच्या चाहत्यांनी चेन्नईच्या संघाची थट्टा केली. काळ्या-पांढऱ्या रंगाच्या, कैद्यांच्या गणवेशावर काही आरसीबीच्या फॅन्सनी 'चेन्नईची २०१६-१७ ची जर्सी' अशा प्रकारचा मजकूर लिहिला. आरसीबीचे चाहते कैद्यांचे कपडे सीएसकेची जर्सी म्हणून विकत आहेत, अशा प्रकारच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. हा प्रकार चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर होत असल्याचे म्हटले जात आहे.

RCB Vs CSK IPL 2025
RCB VS CSK : आरसीबीला मोठा धक्का! चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मॅच विनर खेळाडू संघाबाहेर

२०१६-१७ या वर्षांत स्पॉट-फिक्सिंगमुळे सीएसकेला आयपीएलमधून निलंबित करण्यात आले होते. त्याला जोडूनच ही ट्रोलिंग होत आहे. दरम्यान आयपीएल २०२५ मध्ये ज्या वेळेस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ चेपॉक स्टेडियवर खेळण्यासाठी आला होता. तेव्हा सीएसकेच्या चाहत्यांनी लॉलीपॉप दाखवून आरसीबीच्या संघाला ट्रोल केले होते. या कृतीला प्रतिउत्तर देण्यासाठी हा प्रकार बंगळुरूच्या चाहत्यांनी केला असल्याचे म्हटले जात आहे.

RCB Vs CSK IPL 2025
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनीच्या गुडघ्याला दुखापत? RCB Vs CSK सामन्याआधी फोटो आला समोर; खेळण्यावर प्रश्नचिन्ह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com