
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघ आयपीएलमधील आपला ६वा सामना आज खेळणार आहे.पंजाबने आतापर्यंत झालेल्या सामन्यात ३ विजय मिळवलेत तर २ सामन्यात पराभव स्वीकारलाय. आज चंदीगडच्या स्टेडियमवर केकेआरविरुद्ध ६ वा सामना खेळणार आहे. पंजाब संघाचा शेवटच्या सामना हा सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झाला होता.
पंजाब किंग्जचा दारुण पराभव झाला होता. या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने २४५ धावांचा विक्रमी धावसंख्या उभारली होती, परंतु त्यांचे गोलंदाज हैदराबादच्या फलंदाजी समोर अपयशी ठरले.
दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सने अखेरचा सामना जिंकलाय. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. केकेआरने शेवटच्या सामन्यात सीएसकेचा पराभव केला होता. पण पॉइंट्स टेबलमध्ये केकेआरचा क्रम मात्र घसरलेला आहे. या संघाने ६ सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन जिंकले आहेत आणि तीन गमावलेत.
आता केकेआर आणि पंजाबचा संघ मुल्लानपूरच्या स्टेडियमवर भिडणार आहे.पंजाब किंग्ज आणि केकेआर यांच्यातील सामन्यादरम्यान मुल्लानपूरमधील हवामान पूर्णपणे स्वच्छ असेल. पावसाची अजिबात शक्यता नाही. पण येथे आर्द्रता २२ ते ४० टक्क्यांच्या दरम्यान राहील,अशी अपेक्षा आहे. पण ही खेळपट्टी कोणाला साथ देणार हे जाणून घेऊ.
न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियम हे फलंदाजांसाठी चांगले आहे. या मैदानावर बरेच चौकार आणि षटकार मारले जातात. आयपीएलच्या १८ व्या हंगामात आतापर्यंत या मैदानावर एकूण दोन सामने खेळले गेलेत. या दोन सामन्यांच्या तीन डावांमध्ये २०० पेक्षा जास्त धावा झाल्यात. त्यामुळे पंजाब आणि केकेआर यांच्यातील सामन्यातही मोठी धावसंख्या होऊ शकते. येथील पिच सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना थोडी उपयुक्त आहे.
पण जसजसा खेळ पुढे जातो तेव्हा फलंदाजांना आपला धमाकेदार खेळ करण्यास आणि फटके मारण्यास सोपं होत असतं. पंजाब किंग्ज आणि केकेआर यांच्यातील सामन्यात फलंदाजांचे वर्चस्व राहील.
एकूण सामने-७
प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने- ४ सामने जिंकले
आव्हानचा पाठलाग करणाऱ्या संघाने - ३ सामने जिंकलेत.
सर्वाधिक धावसंख्या- २१९/६
सर्वात कमी धावसंख्या- १४२
पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या - १८० असते.
पंजाब किंग्ज विरुद्ध केकेआर, समोरासमोर सामना
एकूण सामने-३३
पंजाब किंग्ज विजयी - २१
केकेआर विजयी - १२
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.