
भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला मार्च २०२५ साठी आयसीसीकडून सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळालाय. आयसीसीकडून 'प्लेअर ऑफ द मंथ'चा अवॉर्ड जाहीर करण्यात आलाय. हा पुरस्कार श्रेयस अय्यरला देण्यात आलाय. भारतीय संघाच्या मधल्या फळीतील या फलंदाजाने न्यूझीलंडच्या जेकब डफी आणि रचिन रवींद्र यांना मागे टाकत हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकलाय.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी याची घोषणा केली. अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फलंदाजीने शानदार कामगिरी केली होती. त्याने स्पर्धेत २४३ धावा केल्या होत्या. भारताकडून त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरने टूर्नामेंटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. टीम इंडियाला चॅम्पियन ट्रॉफी जिंकवून देण्यास त्याने मोठी भूमिका बजावली होती. पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्रेयसने प्रतिक्रिया दिलीय.
आयसीसीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर श्रेयस अय्यरची प्रतिक्रिया शेअर केलीय. मार्च महिन्यासाठी आयसीसी पुरुष सामनावीर म्हणून निवड झाल्याबद्दल आपण खूप आनंदीत होत असल्याचं त्याने म्हटलंय. हे खूपच खास आहे,विशेषतः ज्या महिन्यात आपण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली - हा क्षण आपण कायमचा जपून ठेवणार असल्याचं श्रेयस म्हणाला.
चॅम्पियन्स ट्रॉफीत श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या ग्रुप स्टेज सामन्यात ७९ चेंडूत ९८ धावांची खेळी केली. यात ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ४५ चेंडूत ६२ धावांची महत्त्वाची खेळी खेळली. श्रेयस अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ४८ चेंडूत ६२ धावा केल्या आणि भारताला चॅम्पियन बनवण्यात मोठी भूमिका बजावली होती.
श्रेयस अय्यरने आयपीएल २०२५ मध्येही चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपला फॉर्म कायम ठेवलाय. पंजाब किंग्जच्या कर्णधाराने आतापर्यंत ५ सामन्यांमध्ये २५० धावा केल्या आहेत. श्रेयसने या हंगामात आतापर्यंत ३ अर्धशतकी खेळी केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २०८.३३ आहे. अय्यर आता हंगामातील उर्वरित सामन्यांमध्ये ही कामगिरी कायम ठेवेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.