
अहमदाबाद : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून हंगामाचा निरोप घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकांत २३० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाला फक्त १४७ धावा करता आल्या आणि सामना गमावावा लागला. संपूर्ण आयपीएलमध्ये सर्वांच्या नजरा धोनीकडे होत्या की, तो निवृत्त होणार की नाही. या सामन्यानंतर धोनीने सांगितले की, निवृत्तीच्या निर्णयाची घाईगडबड नाही, अजून तीन चार महिने पाहूयात.
सलामीसाठी आलेल्या आयुष्य म्हात्रेने २०० च्या स्ट्राईक रेटने १७ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या. डेव्हॉन कॉनवेने ५२ धावा आणि डेवाल्ड ब्रेविसने ५७ धावा केल्या. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनीही चांगली साथ दिली. सर्व फलंदाजांनी मिळून चेन्नई सुपर किंग्सचा डाव २३० धावांपर्यंत नेला. दुसऱ्या बाजूला प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
२३१ धावांचे आव्हान गाठताना गुजरातचे फलंदाज मैदानात उतरले. कर्णधार शुभमन गिल १३ धावांवर माघारी परतला. त्याच्या पाठोपाठ जोस बटलर, शेरफन रुदरफोर्ड बाद झाले. त्यानंतर हळूहळू गुजरातचे सर्व खेळाडू एकामागे एक बाद होऊ लागले. साई सुदर्शनने सर्वाधिक ४१ धावा केल्या. पण चेन्नईच्या गोलंदाजांसमोर गुजरातचे फलंदाज टिकू शकले नाही. १४७ धावांवर गुजरातने डाव गुंडाळला. चेन्नईकडून अन्शुल कंबोज आणि नूर मोहम्मद यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. रवींद्र जडेजानेही २ विकेट्स घेतल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.