IPL 2025 : चेन्नईच्या विजयाचा फायदा मुंबईला, टेबल टॉपर गुजरातला जबर झटका

GT VS CSK : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना रंगला होता. या सामन्यामध्ये चेन्नईच्या संघाने गुजरातचा पराभव केला आहे. हा आयपीएल २०२५ मधला गुजरातचा पाचवा पराभव आहे.
IPL 2025
IPL 2025X
Published On

IPL 2025 मधील ६७ वा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये खेळला गेला. पॉईंट्स टेबलवर शेवटच्या स्थानावर असणाऱ्या चेन्नईच्या संघाने टेबल टॉपर्स गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे. या पराभवाचा परिणाम गुजरातच्या नेट रन रेटवर पडला आहे. चेन्नईच्या विजयाचा फायदा प्लेऑफमध्ये क्वालिफाय झालेल्या इतर संघांना होणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्याच्या घडीने नेट रन रेट पाहता मुंबई (१.२९२) सर्वात वर आहे. त्यामागे पंजाब (०.३२७), गुजरात (०.२५४) आणि सर्वात शेवटी बंगळुरूचा संघ (०.२५५) आहे. आता उद्या पंजाबविरुद्धचा सामना मुंबईने जर जिंकला तर, मुंबई टॉप २ मध्ये जाईल.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात आणि चेन्नई हे दोन संघ आमनेसामने आले. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. २० ओव्हर्समध्ये चेन्नई सुपर किंग्सने ५ विकेट्स गमावून २३० धावा केल्या. डेव्हॉन कॉनवे आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी अर्धशतकीय खेळी केली.

IPL 2025
Dombivli Crime : डोंबिवली हादरली! १५ वर्षीय मुलीचं अपहरण, खोलीत कोंडून लैंगिक अत्याचार, गर्भपातानंतर नको ते केलं...

सलामीसाठी आलेल्या आयुष्य म्हात्रेने २०० च्या स्ट्राईक रेटने १७ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या. डेव्हॉन कॉनवेने ५२ धावा आणि डेवाल्ड ब्रेविसने ५७ धावा केल्या. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनीही चांगली साथ दिली. सर्व फलंदाजांनी मिळून चेन्नई सुपर किंग्सचा डाव २३० धावांपर्यंत नेला. दुसऱ्या बाजूला प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

IPL 2025
MP: आणखी एक 'निर्भया'! प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड अन्...; गर्भाशय शरीराबाहेर आढळलं, नराधमांचं महिलेसोबत अमानवी कृत्य

२३१ धावांचे आव्हान गाठताना गुजरातचे फलंदाज मैदानात उतरले. कर्णधार शुभमन गिल १३ धावांवर माघारी परतला. त्याच्या पाठोपाठ जोस बटलर, शेरफन रुदरफोर्ड बाद झाले. त्यानंतर हळूहळू गुजरातचे सर्व खेळाडू एकामागे एक बाद होऊ लागले. साई सुदर्शनने सर्वाधिक ४१ धावा केल्या. पण चेन्नईच्या गोलंदाजांसमोर गुजरातचे फलंदाज टिकू शकले नाही. १४७ धावांवर गुजरातने डाव गुंडाळला. चेन्नईकडून अन्शुल कंबोज आणि नूर मोहम्मद यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. रवींद्र जडेजानेही २ विकेट्स घेतल्या.

IPL 2025
Akola News : घराला भीषण आग, लेकाला वाचवण्यासाठी बाप जीव मुठीत धरुन धावला, पण...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com