आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी सुरु असलेल्या लिलावातील पहिल्या दिवशी सर्व फ्रेंचायझींनी मिळून ४६७.९५ कोटी रुपये खर्च केले. दुसऱ्या दिवशी फ्रेंचायझींच्या पर्समध्ये कमी रक्कम शिल्लक होती.
मात्र तरीही फ्रेंचायझींनी बोली लावायला कुठलीच कसर सोडली नाही. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमार आगामी हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना दिसणार आहे. या संघाने त्याच्यावर १०.७५ कोटींची बोली लावली. यासह आणखी २ भारतीय वेगवान गोलंदाज आहेत, जे मालामाल झाले आहेत.
मुकेश कुमारने गेल्या काही वर्षांत दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. याचा फायदा त्याला आयपीएल लिलावातही झाला आहे. गेल्या हंगामात तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसून आला होता. गेल्या हंगामात त्याचं मानधन ५.५ कोटी रुपये इतकं होतं. या हंगामात दिल्लीने RTM कार्डचा वापर करुन ८ कोटी रुपयात संघात घेतलं आहे.
वेगवान गोलंदाज आकाशदीप २०२२ पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळतोय. या संघाकडून खेळताना त्याने शानदार गोलंदाजी केली होती. यावर्षी त्याला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. आकाशदीपला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जने बोली लावली. शेवटी लखनऊने ८ कोटी मोजत त्याला संघात स्थान दिलं.
गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसून आलेला दीपक चहर यावेळी मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. मुंबईने भूवनेश्वर कुमारला खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो हातून निसटला. शेवटी मुंबईने डाव टाकला आणि दीपक चहरला आपल्या संघात घेतलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.