IPL 2025: रिषभ पंत CSK कडून खेळणार?  CEO काशी विश्वनाथन यांच्या विधानाने रंगली चर्चा
Rishabh pant yandex

IPL 2025: रिषभ पंत CSK कडून खेळणार? CEO काशी विश्वनाथन यांच्या विधानाने रंगली चर्चा

Rishabh Pant News In Marathi: आगामी आयपीएल हंगामात रिषभ पंत चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळू शकतो. याबाबत बोलताना काशी विश्वनाथन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Published on

आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी सर्व संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. येत्या २४ आणि नोव्हेंबरला मेगा ऑक्शन होणार आहे. गेली काही वर्ष दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व करणाऱ्या रिषभ पंतला आहेत रिलीज करण्यात आलं आहे.

त्यामुळे आगामी हंगामात काही संघ त्याला टार्गेट करताना दिसून येऊ शकतात. ज्यात चेन्नई सुपर किंग्जचाही समावेश असणार आहे. दरम्यान रिषभला संघात घेण्याबाबत संघाचे CEO काशी विश्वनाथन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

IPL 2025: रिषभ पंत CSK कडून खेळणार?  CEO काशी विश्वनाथन यांच्या विधानाने रंगली चर्चा
IND vs SA: नॉर्मल वाटलोय का? Tilak Varmaचा कोएत्जीला स्टेडियमबाहेर षटकार - VIDEO

एका पॉडकास्टमध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायुडूसोबत चर्चा करताना काशी विश्वनाथन म्हणाले की, ' रिटेंशन यादी तयार करण्यापूर्वी आम्ही कर्णधार ऋतुराज गायकवाड, एमएस धोनी आणि कोच स्टीफन फ्लेमिंगसोबत चर्चा केली होती. आमची प्लान स्पष्ट होता, ज्यांनी गेल्या हंगामात संघासाठी योगदान दिलंय त्यांना प्राधान्य द्यायचं. '

IPL 2025: रिषभ पंत CSK कडून खेळणार?  CEO काशी विश्वनाथन यांच्या विधानाने रंगली चर्चा
IND vs SA 2nd T20I: दक्षिण आफ्रिकेने जिंकला टॉस; टीम इंडियाची बॅटिंग; पाहा दोन्ही संघांची Playing XI

काशी विश्वनाथन यांनी स्पष्ट केलंय की, आगामी लिलावात ते स्टार भारतीय खेळाडूंना संघात घेण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. मात्र पर्समध्ये कमी रक्कम शिल्लक असल्याने त्यांच्या हाती निराशा येऊ शकते. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ' आमच्यासाठी ऋतुराज गायकवाड, मथिशा पथिराना, रविंद्र जडेजा , शिवम दुबे आणि एमएस धोनी यांना रिटेन करणं सोपं होतं. आम्हाला हे ही माहित होतं की, आम्ही यांना रिटेन करायला गेलो तर आमचा पर्स रिकामा होईल. लिलावात जेव्हा स्टार खेळाडूंना संघात घ्यायची वेळ येईल तेव्हा आमच्याकडे मोठी बोली लावायला रक्कम शिल्लक नसेल. आम्ही त्यांना आमच्या संघात घेऊ शकू असं मला वाटत नाही, पण आम्ही प्रयत्न नक्कीच करू.'

IPL 2025: रिषभ पंत CSK कडून खेळणार?  CEO काशी विश्वनाथन यांच्या विधानाने रंगली चर्चा
IND vs SA: पुन्हा तीच चूक! सतत संधी मिळूनही भारताचा हा स्टार ठरतोय फ्लॉप

चेन्नईने या ५ खेळाडूंना केलं रिटेन

चेन्नई सुपर किंग्जने आगामी हंगामासाठी कर्णधार ऋतुराज गायकवाडला १८ कोटी, मथिशा पथिरानाला १३ कोटी, शिवम दुबेला १२ कोटी, रविंद्र जडेजाला १८ कोटी आणि एमएस धोनीला अन्कॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन करण्यात आलं आहे. धोनीला ४ कोटी रुपयांत रिटेन करण्यात आलं आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com