IND vs WI Mukesh Kumar Debut: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना त्रिनिदादच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे.
शार्दुल ठाकुरच्या जागी वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला संधी दिली गेली आहे. त्यामुळे हा गोलंदाज सध्या जोरदार चर्चेत आहे. मात्र हा गोलंदाज आहे तरी कोण? कसा राहिला आहे या गोलंदाजाचा प्रवास? जाणून घ्या.
कोण आहे मुकेश कुमार?
मुकेश कुमारबद्दल बोलायचं झालं, तर तो बिहारमधील गोपालगंजचा रहिवासी आहे. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. मुकेशला सैन्यात भरती व्हायचं होतं. यासाठी त्याने तीनदा प्रयत्न देखील केला होता. (Who Is Mukesh Kumar)
मात्र, तिन्ही वेळा तो अपयशी ठरला. मुकेशला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. आपल्या खेळाच्या जोरावर त्याने बिहारच्या अंडर-१९ संघातदेखील एन्ट्री केली होती. (Latest sports updates)
एक सामना खेळण्यासाठी मिळायचे ५०० रूपये...
मुकेशने कोलकात्यात एका खासगी क्लबसाठी खेळायला सुरूवात केली. त्यावेळी त्याला एक सामना खेळायचे केवळ ५०० रुपये मिळायचे. २०१४ मध्ये त्याने बंगाल क्रिकेट असोसिएशनसाठी ट्रायल्स दिले. त्याची दमदार गोलंदाजी पाहुन त्याची बंगालच्या संघाच निवड झाली . त्यानंतर २०१५ मध्ये तो बंगाल संघासाठी पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.
मुकेश कुमारची प्रथम श्रेणी कारकीर्द
मुकेश कुमार हा अष्टपैलू खेळाडू आहे त्याने ३३ प्रथम श्रेणी सामन्यात १२३ विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने ६ वेळा एका डावात ४ आणि ६ वेळा एका डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, त्याने २४ लिस्ट ए सामन्यात २६ विकेट घेतल्या आहेत. T20 क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर मुकेशने २३ सामन्यात २५ विकेट घेतल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.