IPL 2023, RCB vs SRH: हेनरी क्लासेनने घेतला आरसीबीचा क्लास; हैदराबादने उभारला धावांचा डोंगर

RCB vs SRH Match Updates: हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १८६ धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून हेनरी क्लासेनने धुव्वाधार फलंदाजी करत शतकी खेळी केली.
RCB vs SRH Match Updates
RCB vs SRH Match UpdatesIPL/Twitter

RCB vs SRH Match Updates: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ६५ वा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात खेळवला जात आहे. आरसीबीसाठी प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १८६ धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून हेनरी क्लासेनने धुव्वाधार फलंदाजी करत शतकी खेळी केली. त्याने ५१ चेंडूत १०४ धावा कुटल्या. (Latest sports updates)

राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात (Cricket News)  आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजासाठी उतरलेल्या हैदराबादची सुरूवात अत्यंत खराब झाली.

डावखुरा गोलंदाज ब्रेसवेलने सलामीवीर अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठीला झटपट माघारी पाठवलं. अभिषेक शर्माला ११ धावा तर राहुल त्रिपाठीला १५ धावा काढून बाद झाला. सलग दोन धक्के बसल्यानंतर हेन्री क्लासेन आणि कर्णधार एडिन माक्ररमने हैदराबादचा डाव सावरला.

दोघांनी मिळून तिसऱ्या विकेट्साठी ७६ धावांची (Sport Updates) भागीदारी केली. एकीकडे माक्ररमने सावध फलंदाजी करत होता. तर दुसरीकडे क्लासेन आरसीबीच्या गोलंदाजांचा क्लास घेत होता. मात्र, फाफ डू प्लेसिसने शाहबाज अहमदकडे चेंडू सोपावला.

त्याने माक्ररमला बाद करत ही जोडी फोडली. माक्ररम २० चेंडूत १८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर मैदानावर फलंदाजासाठी उतरलेल्या हॅरी ब्रुकने क्लासेनची चांगली साथ दिली. दोघांनी मिळून आरसीबीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

हेनरी क्लासेनने ५१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. १९ व्या षटकात तो हर्षल पटेलला मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. क्लासेनने आपल्या खेळीत ८ चौकार आणि ६ षटकार लगावले.

शेवटच्या काही षटकात हॅरी ब्रुकने फटकेबाजी करत हैदराबादला १८६ धावांपर्यंत पोहचवले. आरसीबीकडून मायकल ब्रेसवेलने २ विकेट्स घेतल्या. याशिवाय हर्षल पटेल, मोहमद सिराज आणि शाहबाज अहमदने प्रत्येकी १-१ विकेट्स घेतली.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com