

आयपीएलच्या (IPL 2022) 15 व्या हंगामातील 37 वा सामना रविवारी लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यात होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. लखनौने लीगमध्ये आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत आणि 4 जिंकले आहेत. LSG सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत पण एकही सामना जिंकलेला नाही. एमआय सध्या पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे.
वानखेडे स्टेडियमची (Wankhede Stadium) खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे. येथे आयपीएलमध्ये सरासरी 180 धावा होतात. मात्र, दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करणे ही सोपे जाते. वानखेडेवरती होणाऱ्या सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली, तर येथे 200 धावांचे लक्ष्य गाठणे सोपे जाते.
24 एप्रिल रोजी मुंबईचे कमाल तापमान 34 आणि किमान 29 अंश सेल्सिअस राहणार आहे. हवामान वेबसाइट accuweather नुसार, सामन्यादरम्यान वातावरण ढगाळ (1 टक्के) असेल. ताशी 44 किमी वेगाने वारे वाहतील. सामन्यादरम्यान वादळ होण्याची शक्यता नाही. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करणे पसंत करेल.
संभाव्य संघ
लखनौ सुपर जायंट्स
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, दुष्मंथा चमिरा, आवेश खान, रवी बिश्नोई.
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, हृतिक शोकीन, रिले मेरेडिथ, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.