IPL 2022 : हैदराबादने उडवला आरसीबीचा धुव्वा; विराट कोहली पुन्हा फेल!

RCB vs SRH 2022: केन विलियमसनच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघाचा यंदाच्या हंगामातील हा सलग पाचवा विजय ठरला
Virat Kohli
Virat KohliSaam TV
Published On

IPL 2022: इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2022) ३६ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने विराट कोहलीच्या आरसीबीचा (RCB vs SRH Match) ९ विकेट्सने दारुण पराभव केला. आरसीबीने (RCB) दिलेले ६९ धावांचे छोटे आव्हान हैदराबादने (SRH) अवघ्या ८ षटकात पूर्ण केले. केन विलियमसनच्या (Ken Williamson) नेतृत्वाखालील हैदराबाद संघाचा यंदाच्या हंगामातील हा सलग पाचवा विजय असून ते आता गुणतालिकेल दुसऱ्या स्थानावर पोहचले आहे. (IPL 2022 RCB vs SRH Live Updates SRH Beat RCB By Nine wickets)

Virat Kohli
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरचे 5 भन्नाट फॅन, सचिनसाठी काहीही करायला तयार

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विलियमसनने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या आरसीबी संघाची सुरूवात अतिशय खराब झाली. हैदबादचा डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को यान्सेनने (Marco Jansen) सलामीवीर फाफ डुप्लेसिस, अनुज रावत, आणि त्यानंतर मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीला (Virat Kohli) झटपट माघारी पाठवलं.

Virat Kohli
IPL 2022: माझ्याशी लग्न करशील? तरुणीने भर मैदानात श्रेयसला केला प्रपोज

आरसीबीकडून सुयश प्रभुदेसाईने सर्वाधिक १५ तर ग्लेन मॅक्सवेलने १२ धावा केल्या. याशिवाय आरसीबीच्या कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. आरसीबीचा संपूर्ण संघ ६९ धावांवर बाद झाला. हैदराबादकडून मार्को यान्सेन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. तर जगदिशन सुचितने २ आणि भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक यांनी १-१ विकेट घेण्यात यश आलं.

हैदराबादचा सलग पाचवा विजय

आरसीबीने दिलेले ६९ धावांचे आव्हान सनरायझर्स हैदराबादने एक विकेट आणि ७२ चेंडू राखून पूर्ण केले. आयपीएलमधील कोणत्याही संघाचा आरसीबी संघावर हा सर्वात मोठा चौथा विजय आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील हैदराबादचा या मोसमातील हा सलग पाचवा विजय ठरला असून ते आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहेत. तर या पराभवामुळे आरसीबीचा संघ चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com