

INDW vs PAKW:क्रिकेट चाहत्यांची भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्याची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. आज आयसीसी महिला टी -२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत - पाकिस्तान संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना केप टाऊनच्या मैदानावर पार पडणार आहे.
या सामन्यात हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येईल. तर बिस्माह मारुफवर पाकिस्तान संघाची जबाबदारी असणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ६:३० वाजता सुरू होणार आहे
भारत - पाकिस्तान सामना हे नेहमीच हाय व्होल्टेज सामना असतो. महिलांच्या सामन्यांमध्ये भारतीय संघ वरचड असतो. मात्र गतवर्षी आशिया चषक स्पर्धेत झालेल्या सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तान संघाकडून पराभव पत्करावा लागला होता.
गोलंदाजांवर असेल जबाबदारी...
भारतीय संघातील खेळाडू दीप्ती शर्मावर फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये ही बहुमूल्य योगदान देण्याची जबाबदारी असणार आहे. भारतीय संघात रेणुका सिंगला वगळता इतर गोलंदाजांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असल्याचे दिसून येत आहे.
तर शिखा पांडे आणि पूजा वस्त्राकरवर देखील भारतीय संघाला विकेट्स मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे.
भारतीय संघाचं पारडं जड..
भारतीय संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया सारख्या मजबूत संघाला आव्हान देण्यासाठी भारतीय संघाला आणखी जोरदार कामगिरी करावी लागणार आहे.
तसेच भारत पाकिस्तान हे दोन्ही संघ १३ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान १० वेळेस भारतीय संघाने बाजी मारली आहे. तर केवळ ३ वेळेस पाकिस्तान संघाला विजय मिळवता आला आहे.
भारतीय संघाची संभावित प्लेइंग ११ : यस्तिका भाटिया, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, देविका वैद्य, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग, राधा यादव, शिखा पांडे.
पाकिस्तानची संभावित प्लेइंग ११: मुनीबा अली (विकेटकीपर), सिद्रा अमीन, बिस्माह मारूफ (कर्णधार), निदा दार, आयेशा नसीम, आलिया रियाझ, ओमेमा सोहेल, कायनात इम्तियाज, फातिमा सना, तुबा हसन, नशरा संधू.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.