Jasprit Bumrah Comeback: 327 दिवसानंतर दुखापतीमुळं संघाबाहेर होता जसप्रीत बुमराह; आता कॅप्टन म्हणून थेट टीम इंडियात एन्ट्री

बीसीसीआयने सोमवारी 31 जुलै रोजी आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.
Jasprit Bumrah News
Jasprit Bumrah NewsSaam TV
Published On: 

Indian Squad Against Ireland: बीसीसीआयने सोमवारी 31 जुलै रोजी आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. आयर्लंड विरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यादरम्यान, १० महिने दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमराहला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. (Latest Marathi News)

बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी जसप्रीत बुमराहाची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर ऋतुराज गायकवाडकडे उपकर्णधारपद सोपवलं आहे. या दौऱ्यासाठी तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, शिवम दुबे, शाहबाज अहमद या युवा खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे.

जसप्रीत बुमराह गेल्या ३२७ दिवसानंतर दुखापतीमुळे संघाबाहेर होता. आयर्लंड दौऱ्यासाठी आता जसप्रीत बुमराह कर्णधारपदाच्या जबाबदारीसह संघात कमबॅक करणार आहे.

बीसीसीआयने निवड केलेल्या १५ खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराह याच्यासह संघात ५ जलद गोलंदाजांचा सामावेश आहे. तसेच संघात वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद आणि रवि बिश्नोई या तीन फिरकीपटूंचा सामावेश करण्यात आला आहे .

भारताचा आयर्लंड दौरा १८ ऑगस्टपासून सुरू आहे. या मालिकेचे तीन सामने मालाहाइड,डबलिन येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार, सायंकाळी सात वाजून ३० मिनिटांनी सामने सुरू होणार आहे. भारताचा आयर्लंड दुसरा आणि तिसरा सामना हा अनुक्रमे २० आणि २३ ऑगस्ट रोजी होणार आहे.

Jasprit Bumrah News
Yuvraj Singh On Stuart Broad: सिक्सर किंग युवराजची स्टुअर्ट ब्रॉडसाठी खास पोस्ट; निवृत्तीनंतर हटके स्टाईलमध्ये दिल्या शुभेच्छा

आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ कसा असेल?

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.