
Yuvraj Singh Post On Stuart Broad Retirement: इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकला आहे. अॅशेस मालिकेतील अंतिम सामना हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील अंतिम सामना ठरणार आहे.
इंग्लंडसाठी दमदार कामगिरी करणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्तीची घोषणा करताच अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान युवराज सिंगने देखील एक पोस्ट शेअर करत हटके कॅप्शन दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने स्टुअर्ट ब्रॉड सोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, 'स्टुअर्ट ब्रॉड तुझे यशस्वी कसोटी कारकिर्दीबद्दल अभिनंदन. जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आणि खरा लेजेंड. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा ब्रॉडी..'
स्टुअर्ट ब्रॉडने इंग्लंड संघासाठी खेळताना अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये २ वेळेस हॅट्रिक घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. इतकेच नव्हे तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ६०० पेक्षा अधिक गडी बाद करण्याची नोंद आहे.
इतकेच नव्हे तर इंग्लंडच्या विजयात त्याने अनेकदा मोलाचे योगदान दिले आहे. मात्र आपल्या कारकिर्दीतील १ षटक तो कधीच विसरू शकणार नाही. २००७ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात युवराज सिंगने एकाच षटकात सलग ६ षटकार मारले होते.
कारकिर्दीच्या सुरुवातीलाच असा विक्रम नावावर होऊनही स्टुअर्ट ब्रॉड खचून गेला नाही. त्याने आणखी मेहनत घेतली आणि जोरदार कमबॅक केलं. (Latest sports updates)
स्टुअर्ट ब्रॉडच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १६६ कसोटी सामन्यांमध्ये ६०२ गडी बाद केले आहेत. तर १३२ वनडे सामन्यांमध्ये १७८ गडी बाद केले आहेत. तर ५६ टी -२० सामन्यांमध्ये ६५ गडी बाद केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.