Indian Cricket Team Sponsor: BYJU’S ते Dream11, टीम इंडियाच्या स्पॉन्सर कंपन्यांना का लागतं ग्रहण? स्पॉन्सर करणं खरंच शापित आहे का?

Indian Cricket Team Sponsors in Crisis: सहारा ते बायजू आणि ड्रीम११ पर्यंत, टीम इंडियाला स्पॉन्सर करणाऱ्या अनेक कंपन्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. भारतीय क्रिकेट प्रायोजकत्वाचा शाप आहे का? कंपन्या का संकटात येतात?
Indian Cricket Team Sponsors in Crisis
From Sahara to Dream11 – Why do sponsors of Team India often end up in financial crisis?saam tv
Published On
Summary
  • टीम इंडियाला स्पॉन्सर केलेल्या सहारा, बायजूस, ड्रीम११ सारख्या कंपन्यांना नंतर मोठे नुकसान झाले.

  • हे संकट शापापेक्षा चुकीच्या व्यावसायिक निर्णयांमुळे उद्भवले आहे.

  • स्पॉन्सरशीपमुळे ब्रँडला ओळख मिळते, पण खर्च मोठा असल्याने धोका वाढतो.

टीम इंडियाला स्पॉन्सर अनेक मोठ्या कंपन्या अनेकवेळा संकटात आल्या आहेत. स्पॉन्सर करताना त्यांच्यावर ग्रहण का लागतं. आर्थिक कचाट्यात आलेल्या कंपन्यांमध्ये सहारा, बायजू असो किंवा आता ड्रीम११ या सारख्या अनेक मोठ्या कंपन्या टीम इंडियाला स्पॉन्सर म्हणजेच प्रायोजित केल्यानंतर अपयशी ठरल्या आहे. हे कंपन्यांचे दुर्दैव आहे की त्यांनी केलेला चुकीचा व्यवसाय? टीम इंडियाला स्पॉन्सर करणं खरं शापित आहे का? कंपन्याचं काय गणित चुकतं ते आपण जाणून घेऊ.

गेल्या काही वर्षांत अनेक आघाडीच्या ब्रँड्सने भारतीय क्रिकेट संघाच्या प्रायोजकत्वात मोठा पैसा ओतलाय. ते मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देतात किंवा देत असतात. पण त्यांना मोठ्या संख्येने भलं मोठं अपयश आलंय. आश्चर्यकारकपणे त्यांचा असा आलेख खाली जाणं अनेकदा प्रश्न निर्माण होतात. त्यातील सर्वात मोठा भयानक प्रश्न म्हणजे ही भागीदारी करणं दुर्दैवी आहे का? टीम इंडियाला स्पॉन्सर करणाऱ्या अनेक कंपन्या डबघाईला का आल्या? स्पॉन्सर केल्यानंतर त्यांना ग्रहण का लागतं असा प्रश्न उपस्थित होतात. दरम्यान अशा कोणत्या कंपन्या होत्या जे मोठ्या आर्थिक तोट्यात गेल्या. तर काही पूर्णत: उद्धवस्त झाल्यात.

विल्स - पहिला प्रायोजक Wills – The First Sponsor

पहिला प्रमुख प्रायोजक (स्पॉन्सर) विल्स होता, जो एक सिगारेट ब्रँड होता, जो १९९६ च्या विश्वचषकादरम्यान भारताच्या जर्सीवर दिसला. या ब्रँडला खूप लक्ष वेधले गेले, परंतु नवीन नियमांनी तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घातल्यानंतर, विल्सला माघार घ्यावी लागली. फक्त त्यांनाच नाही तर अनेक तंबाखू ब्रँडनाला असाच फटका बसला.

Indian Cricket Team Sponsors in Crisis
Virat Kohli Retirement : विराट कोहली IPLमधूनही 'रिटायर' होणार, क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारा दावा

सहारा Sahara

विल्सनंतर २००१ मध्ये सहारा मुख्य प्रायोजक बनला. ही कंपनी टीम इंडियाला २०१३ पर्यंत स्पॉन्सर करत राहिली. ही कंपनी अनेक व्यवसायांमध्ये सहभागी होती, परंतु मोठ्या आर्थिक घोटाळ्यांमुळे ही कंपनी डबघाईला आली. घोटाळा उघडकीस आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कंपनीला सुमारे ३ कोटी गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले. गुंतवणूकदारांची फसवणुक केल्यामुळे कंपनीला मोठा फटका बसला.

स्टार टीव्ही Star TV

सहारा नंतर, स्टार टीव्ही इंडिया संघाचा प्रायोजक बनली. सामन्यांचे प्रसारण हक्क देखील या कंपनीकडे होते. यामुळे निष्पक्षतेबद्दल चिंता निर्माण झाली. कारण त्यांचे नियंत्रण खूप जास्त होते. मग नंतर स्टारने माघार घेतली. त्यानंतर डिस्नेच्या ताब्यात कंपनी गेल्यानंतर आणि जिओकडून नवीन स्ट्रीमिंग स्पर्धा सुरू झाल्यानंतर कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला.

ओप्पो आणि बायजूज OPPO and BYJU’S

सहारा, स्टारनंतर २०१७ मध्ये चिनी फोन कंपनी ओप्पो टीम इंडियाला स्पॉन्सर करू लागली. पण भारत-चीनमध्ये वाढत्या तणावामुळे आणि गलवान संघर्षामुळे भारत सरकारने चिनी कंपनीचा सहभाग मर्यादित केला. त्यानंतर ओप्पो कंपनी करारातून माघार घेतली.

बायजू BYJU

बायजूज या शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या युनिकॉर्नने ५५ दशलक्ष डॉलर्सच्या मोठा करार केला. पण कंपनीच्या नशिबी नुकसान आले. कंपनीला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. यात आर्थिक नुकसान, मोठ्या प्रमाणात नोकऱ्यामधील कपात आणि अमाफ खर्च ( यात ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून लिओनेल मेस्सीची नियुक्तीचा समावेश आहे). त्यानंतर या कंपनीही भारतीय क्रिकेटशी करार तोडले.

Indian Cricket Team Sponsors in Crisis
Cheteshwar Pujara: चांगल्या गोष्टीचा कधीतरी अंत होतोच...! चेतेश्वर पुजाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

ड्रीम११ Dream11 – Latest Sponsor, New Trouble

विल्स, सहारा, स्टार, बायजूजनंतर २०२३ मध्ये ड्रीम११ ने टीम इंडियाला स्पॉन्सर केलं. पण त्यांनाही मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. भारत सरकारने ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के कर लावला, ज्यामुळे फॅन्टसी स्पोर्ट्स इंडस्ट्रीला मोठा फटका बसला. त्यामुळे ही कंपनी प्रायोजक म्हणून टीम इंडियाला स्पॉन्सर करणार की नाही याबाबतचं भविष्य देखील अनिश्चित आहे.

Indian Cricket Team Sponsors in Crisis
Dream11 : बीसीसीआयला मोठा धक्का, ड्रीम ११ ने स्पॉन्सरशिपमधून घेतली माघार

स्पॉन्सर करणं खरेच शापित आहे का?

वाचक मित्रांनो, तु्म्ही असं पाहिलं तर जाणवेल की, टीम इंडियाला प्रायोजित केल्याने म्हणजेच स्पॉन्सर केल्यानं कंपन्यांवर संकटं येतात. पण मित्रांनो प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच आहे, प्रत्येक ब्रँडच्या ह्या स्वतःच्या समस्या होत्या. काहींनी कायदा मोडला, तर काहींनी धोकादायक व्यवसायिक निर्णय घेतले. तर काहींना जागतिक राजकारणाचा फटका बसला.

भारतीय क्रिकेटला स्पॉन्सर करत असल्यानं ब्रँड्स मोठ्या प्रकाशझोतात येत असतात. पण याचाच अर्थ असा असतो की, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाते. त्यांची एक चूक आणि त्याचं मोठं नुकसान करू शकते. त्यामुळेच टीम इंडियाला स्पॉन्सर करणं हे शाप नसेल. तर फक्त एक उच्च-जोखीम, अधिक नफ्यासाठी खेळण्यात येणार खेळ असेल, त्यात नुकसान होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com